लहान मुलांना कोविड १९ ची कोणती लक्षणे आढळून येत आहेत ?

0
197
corona
आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन । जगाला आपले रोद्ररूप दाखवणारा कोरोना व्हायरस अजूनही अस्तित्वात आहे. जगाला या कोरोना विषाणू ने वेढले आहे. कोरोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा भारतात आली आहे. या दुसऱ्या लाटेचे परिणाम खूप भयंकर आहेत. या कोरोनाच्या विषाणू मध्ये काही मिनिटाला हजारो लोकांना संसर्गित करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे कोरोनापासून दूर राहायचे असेल तर  आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांची काळजी खूप घ्यावी लागणार आहे कारण , लहान मुलांना कोरोना  होण्याचा धोका हा सर्वात जास्त आहे.

corona

कोव्हिड 19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या लाटेतल्या संसर्गादरम्यान मुलांमध्ये लक्षणं दिसून येत आहेत. पहिल्या लाटेचा मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम आढळून आला नाही.   पण दुसऱ्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होताना जाणवत आहे. या लाटेत १९ वर्षाखालील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे.  दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रोक  आला आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाचे रुग्णसंख्या कमी झाली म्हणून मुलांना खेळायला बाहेर सोडले जात होते , तसेच  घरातल्या मोठ्यांची सुरू झालेली ऑफिसेस आणि त्यानिमित्ताने होणारा प्रवास ही कारणं या रुग्णसंख्येमागे असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये नेहमीचा  ताप, घसा खवखवणं यासोबतच इतर काही लक्षणं आढळून येत आहेत. लहान मुलांना नेहमी होणाऱ्या पोट बिघडणं, उलट्या होणं अशा समस्या     बालरोगतज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणून मुलांचं पोट बिघडलं वा दुखू लागत, जर अचानक उलट्या झाल्या तर त्याचा संबंध कोरोनाशीही असू शकतो. कधी कधी बोलू न शकणारी मुलं सतत चिडचिड करत असतात. न थांबता रडत असतील, त्रागा करत असतील, तर हे त्यांचं अंग दुखत असल्याचं लक्षण असू शकतं. त्यावेळी आई वडिलांनी  मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. त्यांच्यामध्ये हि कोरोनाची लक्षणे आहेत.

corona

बॉम्बे हॉस्पिटलचे कन्स्लटिंग पीडिआट्रिशियन डॉ. मुकेश संकलेचा म्हणाले,कि , “मुलांना त्यांचे पालक वा कुटुंबातल्या कोणाकडून तरी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. बहुतेक मुलांमध्ये अगदी सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. काहींना जास्त ताप भरल्याचंही आढळलं. यासोबतच काही वेगळी लक्षणंही आढळून आली आहेत. त्यावेळी तोंडाची पण चव जाते. मुलांची जेवणावरची वासना पूर्णपणे उडली जाते. खाणं कमी होते.

दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये आढळलेली वेगळी लक्षणं ——

— पोट बिघडणं
— उलट्या होणं
— डोकेदुखी
— बेशुद्ध पडणं
— सतत चिडचिड करणं, त्रागा करणं
—- अंगावर पुरळ येणं
— डोळे लाल होणं
— हाताच्या वा पायाच्या नखांना किंवा बोटांना निळसर झाक येणं


आवडल्यास नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here