| | |

काय सांगताय!!! दात दुखतोय, ‘हे’ करून बघा नक्कीच आराम मिळेल

हॅलो आरोग्य ऑनलाईन । दातांची समस्या खूपच सामान्य आहे. आपण नेहमीच आपले दात पांढरे शुभ्र मोत्यासारखे दिसण्यासाठी घरगुती उपाय करत असतो. त्यासाठी वेळप्रसंगी डॉक्टर कडे जाऊन दात साफ करणे, त्याचा पिवळेपणा घालवणे हे नेहमीचेच असते. पण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जवळपास सगळ्यांना एकदातरी दाताचं दुखणं झालेलं असणारच. पण हे दुखणं काय आहे हे दातदुखी झालेल्या माणसालाच समजू शकते.  वास्तविक दाताच्या आसपासच्या नसांमध्ये कोणत्याही प्रकारची कीड लागली किंवा त्रास होऊ लागला की, दातदुखीला सुरुवात होते. काही लोकांना दातदुखीचा त्रास इथपर्यंत होतो की, त्यांच्या कानात आणि डोक्याची नस दुखते. दातदुखी आणि दाढदुखी ही दोन्ही असह्य असते. कधीतरी हे दुखणं इतकं वाढतं की, ते जबड्यापर्यंत पोहचतं. यामुळे संपूर्ण चेहऱ्यावर सूज येते. अशा परीस्थितीत खाणं – पिणं शक्यच नसतं. शिवाय दातदुखीचं दुःख सहन करणंही कठीण असतं. दात दुखीवर घरगुती उपाय या लेखातून जाणून घ्या.

 

लवंग तेल (Clove Oil)

दात दुखीवर घरगुती उपाय म्हटले की, सर्वात आधी लवंग हा एकमेव घरगुती उपाय आपल्याला दिसतो. वास्तविक एनसीबीआयच्या अभ्यासानुसार, लवंग अथवा लवंग तेलाचा एका आयुर्वेदिक औषधाप्रमाणे उपयोग होतो. लवंगाच्या तेलामध्ये मुख्य घटक युजेनॉल आणि अॅसिटिल युजेनॉल असल्यामुळे हे एक अँटिइन्फ्लेमटरी आणि एनाल्जेसिक औषध म्हणून काम करते. त्यामुळे दातदुखीवर रामबाण इलाज म्हणून याचा उपयोग होतो. अर्थात संपूर्णतः जरी दातदुखी बंद झाली नाही तरी डॉक्टरकडे जाऊन दाखवेपर्यंत तरी किमान लवंग तेलाचा उपयोग करून दुःख कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. पण याचा आवश्यकतेपेक्षा अधिक उपयोग होणार नाही याचीही काळजी घ्या. तुम्हाला शारीरिक कोणताही त्रास असेल तर वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

 

आल्याची पावडर

हा एक सोपा उपाय आहे, आल्याची पावडर तितकीच उपयोगी ठरते जितकी आयबूप्रोफेनिन (पेनकिलरचे नाव) तुम्हाला त्रासातून मुक्त करते. दाताला कोणतीही जखम झाली अथवा हिरड्या सुजल्यानंतरही तुम्ही आल्याचा उपयोग करून घेऊ शकता. दाताच्या हलक्याफुलक्या त्रासावर आल्याचा तुम्हाला घरगुती उपायांमध्ये उपयोग करून घेता येतो. केसांसाठी आणि आरोग्यासाठीही आल्याचे फायदे होतात.

हिंग

दात दुखीवर घरगुती उपाय करताना हिंग फायदेशीर ठरते. यामध्ये दातदुखी कमी करणारे गुण आढळतात. तसंच यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात. बॅक्टेरियामुळे सडणाऱ्या दातांना वाचविण्यासाठी आणि दातदुखीपासून सुटका करण्यासाठी याचा उपयोग होतो. हिंग दातावर औषधाप्रमाणे काम करते.

कांदा

कांदा केवळ खाण्यामध्ये स्वादच आणत नाही तर तुमच्या आरोग्यासाठी आणि दातासाठीही फायदेशीर ठरतो. दातदुखीवरील घरगुती उपायांमध्ये कांदा उपयुक्त ठरतो. यामध्ये असणारे अँटिबॅक्टेरियल गुण तोंडातील बॅक्टेरियावर परिणामकारक ठरतात. तसंच कांदा एक नैसर्गिक औषध असून याचा कोणताही तोटा दातदुखीवर होत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त वापरू शकता. तसंच कांदा पोटात गेला तरीही त्याने काही त्रास उद्भवत नाही.

लसूण

लसणाचे अनेक फायदे आहेत यामध्ये काहीच शंका नाही. त्यामध्येच दातदुखीवरील घरगुती उपचारातही लसूण उपयोगी ठरते. वास्तविक लसणामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण आढळतात जे दाताच्या प्लाकवर अधिक परिणामकारक ठरतात. अँटिबॅक्टेरियल गुणांमध्ये असलेले महत्वपूर्ण घटक अॅलिसिन असल्याचे समजण्यात येते. तसंच यामध्ये अँटिमायक्रोबियल गुण असून हिरड्यांवरील संक्रमण करणाऱ्या बॅक्टेरियांपासून वाचण्यास मदत मिळवून देते. अनेक टूथपेस्ट अथवा माऊथवॉशमध्येही लसणाचा उपयोग केला जातो. तुम्ही याचा पण वापर करून घेऊ शकता.

मीठाचे पाणी

दातदुखी सुरू झाल्यानंतर मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे हा अत्यंत सोपा उपाय आहे. यामुळे दातदुखी पटकन थांबायला मदत मिळते. मीठाच्या पाण्यामुळे दातातील कीड मरायला मदत मिळते. हे दातदुखीवरील औषध नाही. कायमस्वरूपी औषध तुम्हाला डॉक्टरांकडूनच मिळते. पण तात्पुरती दातदुखी बंद करण्यासाठी याचा तुम्ही हमखास उपयोग करून घेऊ शकता.

पेरूची पाने

दातदुखीवरील घरगुती उपायांमध्ये तुम्ही याचा समावेश करून घेऊ शकता. एका अभ्यासानुसार पेरूच्या पानांमध्ये गआजावेरीन नावाचे अँटप्लाक गुण आढळतात. जे तोंडाच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात. तसंच पेरूच्या पानामध्ये अँटिमायक्रोबियल, अँटीइन्फ्लेमेटरी, एनाल्जेसिक गुणदेखील आढळतात. जे दातदुखीपासून तुम्हाला दूर ठेवतात. तसंच यामुळे तोंडाचा अल्सर आणि दाताचे दुखणे दोन्ही कमी होते.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा एक सुरक्षित आणि परिणामकारक घरगुती उपाय आहे. यामध्ये जीवाणूनाशक गुण असून तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. वास्तविक दाताच्या दुखण्यापासून पटकन सुटका मिळवून देते. बॅक्टेरियापासून वाचविण्यासाठी याचा उपयोग होतो आणि याचा तुम्ही माऊथवॉश म्हणूनही वापर करू शकता.

दालचिनी पावडर

दातासाठी अगदी पारंपरिक पुरातन काळापासून चालत आलेला हा घरगुती उपाय आहे. दालचिनीमध्ये आढळणारे अँटिइन्फ्लेमेटरी गुण दातदुखीपासून सुटका मिळवून देण्यास मदत करतात. यासह दालचिनी तेलही गुणकारी ठरते. मध आणि दालचिनी एकत्र पेस्ट दातदुखीवर घरगुती उपाय म्हणून चांगले फायदेशीर ठरते. मधामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असल्याने त्याचा चांगला उपयोग होतो.

पण दातदुखी होऊ नये म्हणून जर ही काळजी घेतली तर दातदुखी होणारच नाही. दाताच्या स्वच्छतेची काळजी घ्या. दिवसातून दोन वेळा ब्रश करा.  तंबाखू सेवन करू नका. कमी साखरेचे पदार्थ खा. अति गोड पदार्थांचे सेवन टाळा. फायबरयुक्त फळ आणि भाज्यांचे सेवन करा.दूध, दही, चीज अशा पदार्थांचे अधिक सेवन करा. तसंच पौष्टिक आहारावर जास्त भर द्या. काही कालावधीनंतर दाताची तपासणी करून घ्या. नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या