What exactly does it mean for girls to come of age?

मुली वयात आल्या म्हणजे नेमके आहे तरी काय ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । मुली वयात येणे म्हणजे काय ? हा प्रश्न आई वडिलांना सतावत असतील . पूर्वीच्या काळी मुली वयात आल्या कि काही दिवसांत त्यांचे लग्न लावले जायचे . कारण ती एक प्रथा होती . पूर्वीच्या काळात प्रथा आणि परंपरा याला अतिशय महत्व दिले जात होते. त्यामुळे मुलींची लग्न हि फार लवकर होत असत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची माहिती हि त्यांना वेळेवर मिळत नव्हती. मुलींचे ठराविक वय झाले कि त्यांना मासिक पाळी हि येते . त्यांच्या शरीरात अनेक बदल झालेले असतात. तसेच मानसिक रित्या मुली या काळात फार त्रस्त असतात .

वयात येणे हि एक मुलींच्या आयुष्यातील एक प्रक्रिया आहे . वयाच्या १३ किंवा १४ व्या वर्षी मुलींच्या मासिक पाळीला सुरुवात होते. त्याला पदर येणे सुद्धा म्हणतात. मुलींना पहिला पदर आला कि , त्याचे कौतुक होऊन त्याचे औक्षण केले जाते . नारळाने ओठी भरली जाते . सुरुवातीचे काही पाच दिवस मुलींसाठी घरात वेगवेगळे पदार्थ केले जातात. आणि ते मुलींना खायला दिले जातात. सुरुवातीला होणारे कौतुक हे दुसऱ्या मासिक पाळीच्या वेळी नसते . त्यांना विटाळ म्हणून एका दुसऱ्या ठिकाणी बसवले जाते. त्यांना कोणत्याच गोष्टीना हात लावू दिला जात नाही. म्हणजे त्यानंतरच्या काळात त्यांना अस्पृश्य लेखले जाते . त्यामुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम झालेले दिसून येतात.

वयात आल्याची पहिली सुरुवात म्हणजे मासिक पाळी . त्यानंतर त्यांच्या शरीरात काही बदल व्हायला सुरुवात होतात. मुलींच्या छातीच्या आकारात बदल झालेले दिसून येतात. तसेच चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होते. अवघड जागेवर केस वाढायला सुरुवात होते . त्या काळात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षणे निर्माण होतात. ती मुलींची चूक नसते. त्यांच्या शरीरात झालेल्या हार्मोन्स बदलामुळे त्यांना अश्या काही गोष्टीना सामोरे जावे लागते. सुरुवातीच्या काळात मासिक पाळी बाबत फार नकारात्मक असतात.पण त्यानंतर त्यांना सवय झालेली असल्याने त्या नकारात्मक न होता . नेहमी पॉसिटीव्ह विचार करतात. सुरुवातीच्या काळात हि मासिक पाळी नको अशी काहीशी भावना मुलींच्या मनात निर्माण होते .