‘एक्झिमा’ म्हणजे नक्की काय? लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मुळात ‘एक्झिमा’ हा एक त्वचारोग आहे. मात्र, या आजाराबद्दल आजही लोकांना तितकीशी माहिती नाही. यामुळे एक्झिमा संदर्भात लोकांमध्ये मोठा संभ्रम दिसून येतो. या आजारात त्वचेवर लाल डाग उठतात आणि असह्य खाज येते. शिवाय खाजवल्यामुळे त्या जागी सूज येते आणि जखम होऊन त्यातून पाणी येऊ लागते. एक्झिमा हा एक अनुवांशिक आजार आहे. तो स्पर्शाद्वारे एकमेकांमध्ये पसरत नाही.

बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे कि, ज्या व्यक्तीला एक्झिमा आहे त्यांना स्पर्श केल्याने हा आजार पसरतो. मात्र जर तुमच्या घरात कुणाला एक्झिमा असेल आणि घरात लहान बाळ असेल तर त्या बाळाला हा आजार होण्याचा धोका असतो. कारण त्यांची त्वचा खूप संवेदनशील असते. याकरिता, आपण आपल्या बाळाला या आजारातून सुरक्षित ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापर करू शकता ‘एक्झिमा’ या आजाराची बरीच कारणे असू शकतात. खरंतर हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, अनेक लोकांच्या मनात ‘एक्झिमा’बद्दल गैरसमज असल्यामुळे यावर उपचार करणे टाळले जाते. म्हणूनच आज आपण या आजाराची कारणे आणि उपाय जाणून घेऊयात.

– ‘एक्झिमा’ कश्यामुळे होतो?
बरेच जण म्हणतात कि तणावामुळे एक्झिमा होतो. मात्र हा एक शुद्ध गैरसमज आहे. एक्झिमा हा आजार कोणत्याही ताणामुळे होत नाही. मात्र जास्त ताण आपल्या त्वचेसाठी हानिकारक असतो हे एक सत्य आहे. दरम्यान वाढत्या ताणामुळे शरीरातील तणाव संप्रेरक मोठ्या प्रमाणात वाढतात. ज्यामुळे त्वचेवर सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.

– एक्झिमा आजारावर उपचार तरी काय?
मुळात म्हणजे हि गोष्ट जाणून घ्या कि एक्झिमा बरा करण्यासाठी कोणताही निश्चित उपचार नाही. मात्र वारंवार मॉइश्चरायझर आणि दाहक – विरोधी औषधे खाल्ल्याने त्वचेवर सूज आणि लालसरपणा येणे कमी होते. अनेकदा लवकर बरे होण्याच्या नादात यांचा अतिवापर करतात आणि यामुळे त्वचेच्या समस्यांमध्ये वाढ होते. त्यामुळे त्वचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कोणतीही औषधे घ्या.

तसेच जास्त व्यायाम करणे टाळा जेणेकरून आपल्याला अधिक घाम येणार नाही. घराबाहेरून आल्यानंतर अंघोळ करण्याची सवय लावून घ्या. यामुळे त्वचेवर जमा झालेली धूळ निघून जाईल. शिवाय थंडीच्या दिवसांत त्वचेला मॉइश्चराइज्ड ठेवा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *