What exactly is in Vaseline used on cold days?

थंडीच्या दिवसांत वापरात असलेल्या व्हॅसलिन मध्ये नेमके आहे तरी काय ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  भारताला नेहमी तीन ऋतूंचा सहवास लाभला जातो. पावसाळा सुरु झाला कि थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. थंडीमुळे हात पाय हे थंड पडले जातात. तसेच हात आणि पाय दोन्ही काही प्रमाणात फुटले जातात. थंडीस सुरु झाली कि काही प्रमाणात बॉडी लोशन लावणे सुरु होते. मग वेगवेगळ्या क्रीम आणि बॉडी लोशन्स, मॉइश्जरायझर क्रीम, बॉडी मिल्क याचा वापर हा आपल्या शरीरासाठी केला जातो.

हिवाळ्याच्या दिवसांत प्रत्येकाच्या घरात हे व्हॅसलिन हे असतेच . हिवाळा आला कि त्यादिवसापासून व्हॅसलिन ची जाहिरात हि खूप जोरात दाखवली जाते. नसेल घरात तरी हिवाळा सुरु झाला म्हणून व्हॅसलिन आणून घरात हे ठवतोच. व्हॅसलिन लावतो खरं , पण व्हॅसलिन हे कश्यापासून बनले जाते हा प्रश्न निरुत्तरच राहते. व्हॅसलिन म्हणजे एक पेट्रोलियम पदार्थ होय . १८७२ साली रॉबर्ट चेसब्रो नावाच्या एका रसायनतज्ञाने कच्च्या पेट्रोलियमच्या गाळसाळात मिळणार्‍या मेणचट पदार्थापासून, म्हणजे रॉड वॅक्सपासून त्याची निर्मिती केली आणि त्याचे पेटंट पण घेतले.

अनेक वेळा आपण वापरत असलेले व्हॅसलिन हे खूप विश्वासू आहे असे म्हंटले जाते, पेट्रोलियम जेलीच्या प्रक्रियेदरम्यान तेलामधून काढून टाकले जाणारे घटक काही प्रमाणात कार्सिनोजेनिक म्हणजेच अपायकारक असतात. व्हॅसलीनमध्ये हे सर्व घटक बहुधा काढून टाकले जातात. आपल्या त्वचेसाठी म्हणून पेट्रोलियम जेली मॉरीश्चराइझ्ड आणि हायड्रेटेड त्वचेचा भास निर्माण करते. आपल्या त्वचेच्या रंध्रांना बुजवल्यासारखे असते. पेट्रोलियम जेली हे वॉटर-रीपेलेंट म्हणजेच पाणीरोधक आहे. ते पाण्यात न विरघळणारे आहे याचा अर्थ ते केवळ अडथळा बंद करते जेणेकरून त्वचा आतील ओलावा सोडत नाही. त्यामुळे आपली त्वचा मऊ आणि नरम राहते, कोरडेपणा नाहीसा होतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला खूप चांगला असा फील येतो.