| | |

पांढऱ्या आणि पिवळ्या तुपात नेमका फरक काय?; जाणून घ्या कोणते तूप जास्त आरोग्यदायी

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि तूप खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असत. शिवाय तूप खाण्यामुळे पदार्थाची चव वाढते, अन्नाची शुद्धता आणि पोषकता वाढते. म्हणून नेहमी साजूक तुपाचे सेवन करणे गरजेचे आहे. पण अनेकांना असा प्रश्न पडतो कि साजूक तूप म्हणजे नक्की काय? याचे कारण म्हणजे, साधारण तूप एकतर पांढऱ्या रंगाचे असते. नाहीतर पिवळ्या रंगाचे. आता यापैकी कोणते तूप खाणे फायदेशीर आहे आणि कोणते नाही? किंवा यातील कोणते तूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे? असा प्रश्न पडणे फार साहजिक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यातील फरक सांगणार आहोत आणि अधिक माहिती देणार आहोत जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० पांढरे तूप कशापासून बनते?
– पांढऱ्या रंगाचे तूप म्हणजे म्हशीच्या दूधापासून काढलेले तूप.
या तुपामध्ये समाविष्ट असणारे फॅट हे कमी असते. यामुळे हे तूप जास्त काळ टिकते. शिवाय म्हशीच्या दुधाचे तूप आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते. कारण म्हशीच्या दुधात असलेले मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचा संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो. म्हशीच्या तुपाचे फायदे खालीलप्रमाणे:-
१) हाडे मजबूत होणे.
२) वजन वाढणे.
३) शारीरिक ऊर्जेत वाढ होते.
४) ह्रदयाचे कार्य सुरळीत होणे.
५) मांसपेशी आणि शरीराची उत्तम वाढ होते.

० पिवळे तूप कशापासून बनते?
– पिवळं तूप म्हणजे गाईच्या दुधापासून काढलेले तूप.
या तुपामध्ये गाईच्या दुधातील प्रोटीन्स, मिनरल्स, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्स हे सर्व घटक समाविष्ट असतात. यामुळे गायीच्या दुधाचे तूप खाणेदेखील शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो. गायीच्या तुपाचे फायदे खालीलप्रमाणे:-
१) वजन कमी कारण्यासाठी फायदेशीर.
२) लहान मुलं, आजारी माणसं, वृद्ध, गरोदर महिला यांना गाईचे तूप खायला द्या. कारण ते पचण्यास हलके असते.
३) ह्रदयाच्या कार्यासाठी हे तूप अतिशय फायदेशीर.
४) त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम.
५) या तुपामुळे रक्त शुद्ध होण्यास फायदा होतो.

० कोणतं तूप जास्त लाभदायक?
मित्रांनो, तुम्ही खात असलेलं तूप हे गाईचं असो किंवा मग म्हशीचं ते देशी असेल तर कोणत्याही स्वरूपात तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. मात्र तरीसुद्धा अनेक वर्षांपासून गाईच्या तुपाला जास्त लोकप्रियता आहे. याचे कारण म्हणजे अनेकांच्या सांगण्यातून असे समोर येते कि,
– गाईच्या दुधातील तूपात जास्त व्हिटॅमिन्स असतात.
ज्यामुळे ते मुल, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी पोषक असते. शिवाय यात जास्त प्रमाणात अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि फंगल आणि अॅंटि ऑक्सिडंट असतात.
– तर म्हशीच्या दुधातील तुपात जास्त फॅट असतात.
ज्यामुळे ते पचायला जड असते. मात्र शरीरयष्टी सुधारण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी हे तूप फायद्याचे आहे.