Fat Cut
| |

व्यायामानंतर शरीरात साचलेल्या चरबीचे काय होते..?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जगातील १००% व्यक्तींपैकी फक्त ७५% किंबहुना त्याहूनही कमीच लोक नियमित व्यायाम करतात आणि त्याचे महत्व जाणतात. उरलेले आपल्या आयुष्यात आळशीपणाला अधिक महत्व देण्याचे महान कार्य करतात. त्यामुळं विविध आजारांची ओळख आणि संगती अश्याच लोकांसोबत आधी होते. साधारणपणे प्रत्येकाला व्यायामाचे फायदे माहित असतात. पण तरीही तो करायलाच हवा का…? असा एक प्रश्न जवळजवळ सगळ्यांनाच पडतो. आता आज आम्ही तुम्हाला व्यायामामूळे आपल्या शरीरात होणाऱ्या सर्वात मोठ्या बदलाबाबत सांगणार आहोत. व्यायामाच्या फायद्या तोट्यांसोबत व्यायाम केल्यावर शरीरातील चरबीचं काय होतं..? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का..? पडला असेल तर आज आम्ही याचे उत्तर तुम्हाला तज्ञांच्या निकषांमधून देणार आहोत.

० व्यायामानंतर शरीरातील चरबीचे काय होते..?

तज्ञांच्या अभ्यासानुसार, शरीरातली चरबी ही कार्बन डाइऑक्साइड आणि पाण्याद्वारे शरीराबाहेर पडते. कारण चरबीचे स्नायूत वा ऊर्जेत रुपांतर होणे अशक्य आहे. त्यामुळे चरबी अशाप्रकारे शरीराबाहेर उत्सर्जित होते. या प्रक्रियेमध्ये फुफ्फुसाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. कारण ते श्वसनात महत्त्वाची जबाबदारी बजावतात. चरबीचे पाणी झाल्यावर ती लघवी आणि घामाद्वारे बाहेर पडते. व्यायामाच्या सहायाने जर तुम्ही १० किलो चरबी कमी केलीत तर त्यापैकी ८ किलो कार्बन डायऑक्साईड आणि १.६ किलो पाण्याच्या रुपाने शरीराबाहेर पडते. सोप्या भाषेत सांगायचं तर कमी केलेलं वजन हे श्वसनाद्वारे शरीराबाहेर पडते.

० वजन कमी करायला काय कराल?

तज्ञ सांगतात कि, वजन कमी करण्यासाठी शरिरातून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडणं गरजेचं आहे. आपण श्वास सोडल्यावर कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. मग जलद गतीनं श्वासोच्छ्वास करून अधिक कार्बन डायऑक्साइड बाहेर काढता येतो का..? तर याच उत्तर नाही असे आहे. तर स्नायूंच्या नियमित हालचाली करा म्हणजेच व्यायाम करा असं तज्ञ सांगतात.

Eating

शिवाय व्यायामाशिवाय वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे कि, वजन कमी करायचं असेल तर कमी खा आणि जास्त काम करा. कमी कॅलरीचं जेवण खाल्ल्याने वजन कमी होण्यास अधिक मदत होते असे तज्ञांनी अभ्यासाद्वारे सिद्ध केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *