| | | |

हिवाळ्यात केळी खाल्ल्याने काय होते?; जाणून घ्या फायदे आणि तोटे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। केळी हे असे फळ आहे ज्यात फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साहजिकच आपल्या आरोग्यासाठी ते खाणे लाभदायक आहे. याशिवाय केळ्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅगनीज, लोह, फोलेट आणि इतर अनेक आरोग्याला आवश्यक असणारी जीवनसत्वे असतात. मात्र अनेकदा अनेकांना असा प्रश्न पडतो कि, हिवाळ्याच्या दिवसात केळी खावी का खाऊ नये? याचे कारण म्हणजे सर्दी होण्याची शक्यता व अन्य आरोग्यविषयक भीती. पण मुळात थंडीत केळी खाण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. ज्यांना आरोग्यविषयक समस्या नाही त्यांच्यासाठी केली खाणे निश्चित फायदेशीर.. तर ज्यांना आरोग्य विषयक समस्या आहेत त्यांच्यासाठी तोटे देणारे. आता हे फायदे तोटे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

० हिवाळ्यात केळी खाण्याचे फायदे :-

१) हिवाळ्यात हाडांशी संबंधित समस्या वाढतात. मात्र केळी खाल्ल्याने हाडांची घनता राखली जाते आणि ते मजबूत राहतात. याचे कारण म्हणजे केळ्यात आढळणारे पोटॅशियम, कॅल्शियम, मँगनीज, मॅग्नेशियम आणि लोह. याशिवाय अधिक अनेक पोषक तत्त्वे केळ्यात असतात जी आरोग्यविषयक इतरही लाभ देतात.

२) केळ्यामध्ये कॅल्शियम, मॅगनीज, लोह, फोलेट, नियासिन, रिबोफ्लेविन आणि बी ६ सारखी सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ही सर्व पोषकतत्व शरीराला आतून ऊर्जा देऊन सक्षम ठेवतात. परिणामी आपले शरीर निरोगी निरोगी राखण्यास मदत होते.

३) केळ्यामध्ये फायबर भरपूर असते. त्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहते. यामुळेच लवकर भूक लागत नाही आणि हिवाळ्यात वजन वाढत नाही.

४) केळी खाल्ल्याने हृदयविकार आणि उच्च रक्तदाब टाळता येतो. केळ्यातील फायबर हृदयरोगांपासून संरक्षण करते. तर केळ्यातील पोटॅशियम हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

५) अचानक जर तुम्हाला रात्रीच्या वेळी भूक लागली वा गोड खायची इच्छा तर केळी खा. कारण केळी जीवनसत्त्वे आणि फायबरने समृद्ध असण्यासोबतच भूक दूर करण्याचे काम करते.

६) पोटॅशियमयुक्त केळी दिवसभराच्या मेहनतीनंतर स्नायूंना आराम देण्यास मदत करतात. त्यामुळे संध्याकाळी १ केळ खाल्ल्याने थकवा कमी होतो आणि झोप चांगली लागते.

 

० हिवाळ्यात केळी खाण्याचे तोटे :-

१) ज्या व्यक्तींना सतत सर्दी होते अश्या व्यक्तीची थंडीत केले खाऊ नये. यामुळे सर्दी वाढते आणि परिणामी ताप येण्याची शक्यता असते.

२) सायनस असणाऱ्या व्यक्तींनी इतर दिवशी प्रमाणात तर थंडीत केळे न खाणे उत्तम. यामुळे सर्दी झाल्यास घोळाणा फुटू शकतो. शिवाय श्वसनविकार होण्याची शक्यता असते.

३) एखाद्या व्यक्तीस श्वसनक्रियेचा आजार असेल वा खोकला, सर्दी असेल तर थंड वातावरणात रात्री केळे खाणे प्रामुख्याने टाळावे. कारण ते कफच्या संपर्कात आल्यास शरीरात जळजळ निर्माण करते.

४) आयुर्वेदानुसार थंडीमध्ये रात्री केळी खाणे टाळावे. कारण यामुळे खोकला आणि सर्दी वाढू शकते.

५) ज्या लोकांच्या हाता पायाला सर्दी असते त्यांनी थंडीमध्ये प्रामुख्याने केळी खाणे टाळावे.

६) लठ्ठपणाने ग्रासलेल्या लोकांनी हिवाळ्यात केळी खाल्ल्यास वजन कमी करण्यात अडचण येते.