| |

बाथरूम स्ट्रोक म्हणजे काय?; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीसाठी टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्यात बाथरूम स्ट्रोकचा धोका जास्त असतो असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. मुळात बाथरूम स्ट्रोक म्हणजेच ब्रेन स्ट्रोक. पण प्रत्येकाने हि समस्या अनुभवली असेलच असे नाही. परंतु अनेक वेळा आपण या समस्येला बळी पडतोय हे लक्षात न आल्यामुळे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बाथरूम स्ट्रोकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन आम्ही करू इच्छितो. यासाठी निश्चितच तुम्हाला त्याच्या लक्षणांची माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला आज बाथरूम स्ट्रोक म्हणजे नक्की काय आणि त्याची लक्षणे काय हे सांगणार आहोत. शिवाय ऐन थंडीत यासाठी आरोग्याची कशी काळजी घ्यावी हेदेखील सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० बाथरूम स्ट्रोक म्हणजे नक्की काय?
– हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे आणि मुख्य म्हणजे थंड पाणी थेट डोक्यावर टाकणे अश्या कृतीमुळे मेंदूतील तापमान नियंत्रित करणारे एड्रेनालाईन हार्मोन वेगाने उत्सर्जित होते. परिणामी रक्तदाब अचानक वाढतो आणि ब्रेन स्ट्रोकचा धोकाही. शिवाय तुम्हाला हृदय विकार, लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या समस्या असतील तर हा त्रास अधिक होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया ब्रेन स्ट्रोकची लक्षणे खालिलप्रमाणे:-

० ब्रेन स्ट्रोकची लक्षणे 
१) शरीराच्या एका भागात कमजोरी.
२) बेशुद्ध होणे.
३) हात-पाय सुन्न होणे.
४) चेहरा वाकडा होणे.
५) समजण्यात आणि बोलण्यात समस्या
६) यासोबतच स्ट्रोकवेळी अर्धांगवायू होऊ शकतो.

० आंघोळ करताना घ्या काळजी

१) हिवाळ्यात अंघोळीसाठी कधीही थंड पाणी वापरू नका.

२) गरम पाण्याने आंघोळ करायला आवडत नसेल तर कोमट पाण्याने अंघोळ करा.

३) अंघोळ करताना कधीच डोक्यावर आधी पाणी टाकू नका.
– प्रथम पायांवर
– त्यानंतर गुडघ्यावर
– मग पोटावर
– आता शरीराच्या इतर अवयवांवर थोडे-थोडे पाणी टाका.
– शेवटी डोक्यावर पाणी घ्या.

४) शॉवरने अंघोळ वापरत असाल तरी डोक्याऐवजी शरीराच्या इतर भागावर आधी पाणी घ्या.