Remedies For Cold
| | |

सर्दी म्हणजे काय? ती का होते आणि कमी करण्याचे उपाय काय?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सामान्य सर्दी, ज्याला फक्त सर्दी म्हणून ओळखले जाते ती वरच्या श्वसनमार्गाचा एक विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे. हा रोग प्रामुख्याने नाकांवर परिणाम करतो. नाकातून पाणी वाहणे हे याचे सर्वसामान्य लक्षण आहे. याची अनेक कारणे असू शकतात. त्यांपैकी इन्फेक्शन आणि ॲलर्जी अशी दोन प्रमुख आहेत. सर्दीमुळे घसा, सायनस आणि स्वरयंत्रावर विपरीत परिणाम होतो. कोणत्याही संसर्गजन्य विषाणूच्या संपर्काने आल्यानंतर दोन दिवसात सर्दीची चिन्हे आणि लक्षणे दिसतात. यात खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, शिंका येणे, डोकेदुखी आणि ताप या लक्षणांचा समावेश आहे. लोक सर्दीतून बहुधा आठवड्याभरात बरे होतात. मात्र हि लक्षणे तीन आठवड्यांपर्यंतदेखील टिकू शकतात.

सर्दी म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्दी म्हणजे नाकाच्या आतील त्वचेला होणार संसर्ग. ज्यामुळे नाकाला गळती लागून वारंवार नाक शिंकरावे लागते. त्यामुळे सर्दी वा शेंबूड नाकातच तयार होतो आणि अनेकता कपाळात व डोळ्यांखाली ज्या मोकळ्या पोकळ्या असतात (सायनसेस) त्यांच्यात साठतो. मुख्य म्हणजे हा आजार जरी विषाणूजन्य असला तरीही औषध घेऊन आपोआप बरा होतो. फक्त अश्यावेळी औषधांसोबत घरगुती उपायदेखील करावेत म्हणजे लवकर बरं वाटतं.
जाणून घ्या सोप्पे घरगुती उपाय. जे सर्दी कमी करण्यासाठी अत्यंत परिणामकारक आहेत.
खालीलप्रमाणे:-
तुळस आल्याचा काढा

तुळस आल्याचा काढा
तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण घरगुती उपाय मानले जातात. कारण या दोन्हीमध्ये असणारे औषधी गुणधर्म सर्दीवर परिणामकारक आहेत. रस्ताही १ कप गरम पाण्यात तुळशीची ५ – ७ पाने आणि आल्याचा १ तुकडा टाकून हे पाणी उकळून घ्या. हे पाणी अर्ध झाल्यानंतर तयार काढा प्या. अगदी काही दिवसांतच या उपायाने आराम मिळेल.

आल्याचा चहा

आल्याचा चहा
आलं मुळात उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे त्याचा साडीत फायदा होतो. म्हणून सर्दी किंवा खोकला झाल्यास आल्याचा चहा प्यावा. यासाठी ताजं आलं बारीक करून घ्या आणि १ कप गरम पाणी वा दुधात मिसळून चांगलं उकळवून हे प्या. यामुळे लगेच घशाला आराम पडेल आणि सर्दी पातळ होऊन नाकावाटे वाहून जाईल.

हळदीचे दूध

हळदीचे दूध
गरम पाणी किंवा गरम दूधात १ चमचा हळद घालून प्यायल्याने सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त आहे. कारण हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते. जी संसर्गजन्य विषाणूंशी लढण्यास मदत करते.

लसूण

लसूण
लसूण अँटीबॅक्टरील गुणधर्मांची परिपूर्ण असते. त्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या विषाणूंशी लढण्यासाठी लसूण सहाय्यक आहे. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं. हे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल अश्या तत्त्वांनी समृद्ध असते. म्हणून लसणाच्या ५ कळ्या तुपात भाजून घ्या आणि खा. असे दिवसातून २ वेळा केल्यास सर्दी खोकला लगेच कमी होतो.

लिंबू मधाचे मिश्रण

लिंबू मधाचे मिश्रण
लिंबू आणि मधाचे मिश्रण सर्दी-खोकला असताना प्यायल्याने शरीराला फायदा होतो. यासाठी २ चमचे मध आणि १ चमचा लिंबाचा रस १ ग्लास कोमट पाण्यात वा गरम दूधात मिसळून प्या आणि जादू पहा. तुमचा सर्दी खोकल्याचा त्रास काही दिवसांतच दूर पळून जाईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *