डिटॉक्स ड्रिंक म्हणजे काय आणि कसे बनवायचे? लगेच जाणून घ्या

0
340
आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती भक्कम असणे गरजेचे आहे आणि ती वाढविण्यासाठी आपण डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता. कारण हे पेय पोषक तत्वांनी विशेष समृद्ध असते. तर रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आपण रोजच्या दिनचर्येत याला समाविष्ट करू शकता. शिवाय यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासह आणि त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी मदत होते. तर जाणून घेऊयात डिटॉक्स ड्रिंक म्हणजे काय आणि घरी ते कसे बनवायचे.

डिटॉक्स ड्रिंक म्हणजे सफरचंद, बिट आणि गाजर यांचे मिश्रण. याला एबीसी डिटॉक्स ड्रिंक असेही म्हटले जाते. हे एक पोषक द्रव्य आहे.जे शरीराला डिटॉक्स अर्थात स्वच्छ करण्याचे काम करते. हे एबीसी डिटॉक्स ड्रिंक लिव्हर, किडनी, आतडे आणि त्वचेतून अनावश्यक व विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. शिवाय याचे सेवन केल्याने आपण निरोगी राहतो.

१) सफरचंद – सफरचंद हे एक पूर्ण आणि सर्वाधिक पौष्टिक असे समृद्ध फळ आहे. यात व्हिटॅमिन ए बी १, बी २, बी ६, नियासिन, झिंक, कॉपर आणि पोटॅशियम संतुलित प्रमाणात असते ज्याचे आपल्या आरोग्यास अतिशय लाभदायक फायदे आहेत. शिवाय सफरचंदात फ्लेव्होनॉइड असते. हे लिव्हरमधील विष बाहेर काढून टाकते. तसेच सफरचंदात व्हिटॅमिन सी असते जे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.

२) बीट – बीट हे एक कंदफळ आहे. ज्याच्या मूळ आणि शिरांमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, पोटॅशियम, आयर्न आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात असते. त्यामध्ये लाइकोपीन आणि अँथोसायनिन हे अँटिऑक्सिडंट असतात. जे त्याला गुलाबी – जांभळा रंग देतात. शिवाय आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. बीट आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते. या व्यतिरिक्त बीटमध्ये अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म असतात. जे लिव्हरचे संरक्षण करते.

३) गाजर – गाजरामध्ये व्हिटॅमिन ए ,बी१, बी२, बी३, नियासिन, फोलेट आणि पँटोथिनिक एसिड, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सेलेनियम इतके पोषक घटक असतात. शिवाय गाजर देखील कंद फळ व एक फळ भाजी आहे. गाजरामध्ये बीटा केरोटीन असते, जे डोळे निरोगी ठेवण्यास आणि रोगांना दूर ठेवण्यास मदत करते.


आवडल्यास नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here