Liver Transplant
|

लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे काय..?; जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पोटाशी संबंधित आजार असणे आजकाल फारच सर्वसामान्य बाब झाली आहे. चुकीची जीवनपध्दती, सकस आहाराचा अभाव, विविध व्यसने, व्यायामाचा कंटाळा, फास्ट फूडचा अतिरेक या कारणांमुळे पोटाचे विकार कोणत्याही वयात होतात. पण या सगळ्यात तुमच्या आरोग्याचे नुकसान होत आहे हे तुम्हाला कधी समजणार..? या प्रत्येक सवयीमुळे तुमच्या लिव्हरवर अर्थात यकृतावर ताण येतो. परिणामी यकृताचे कार्य अस्थिर होते आणि यकृत अकार्यक्षम होते.

आजकाल अनेक फॅटी लिव्हरच्या आजाराने देखील त्रासलेले आहेत. अशा आजारात यकृतामध्ये इन्फेक्शन आढळल्यास त्यावर उपचार करणेदेखील अत्यंत कठीण जाते. परिणामी लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा डॉक्टर सल्ला देतात. याचे कारण म्हणजे लिव्हर इन्फेक्शनमुळे पोटाचा कर्करोग होऊ शकतो. म्हणून योग्य वेळी योग्य तो सल्ला आणि उपचार नेहमी महत्वाचे. मात्र लिव्हर ट्रान्सप्लांटविषयी अनेक लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांटविषयी आवश्यक सर्व माहिती देणार आहोत.

० लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे काय..?

हि एक शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये रुग्णाचे निकामी यकृत जे कोणत्याही औषध वा उपचाराने बरे होत नाही ते संपूर्णतः किंवा अंशतः काढले जाते व त्याजागी नवीन तसेच निरोगी यकृताचे प्रत्यारोपण केले जाते.

० लिव्हर ट्रान्सप्लांट का करतात..?

यकृताचा निकामीपणा आरोग्यविषयक तक्रारी वाढवू शकतो. शिवाय यामुळे माणसाला विविध रोग जडतात. परिणामी यांची तीव्रता वाढल्यास माणूस दगावू शकतो आणि म्हणून लिव्हर ट्रान्सप्लांट (यकृत प्रत्यारोपण) केले जाते.

० लिव्हर ट्रान्सप्लांट करताना शारीरिक चाचण्या आवश्यक आहेत का..?

होय. लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी सर्व शारीरिक चाचण्या आवश्यक आहेत. कारण यकृत निकामी झाल्यास त्याचे प्रत्यारोपण करण्यासाठी एखादा दाता (डोनर) मिळणे आवश्यक असते. परंतु अनेकदा शरीर दुसऱ्या यकृताचा स्वीकार करत नाही. अशावेळी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याची शक्यता असते. यावेळी रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आवश्‍यक त्या सर्व चाचण्या कराव्या.

० लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर शरीराला पुरेपर वेळ द्या.

यकृत प्रत्यारोपण यशस्वी झाल्यावरदेखील रुग्णांनी काळजी घेणे आवश्‍यक असते. शस्त्रक्रियेनंतर किमान आठवडाभर रुग्णाला तज्ज्ञांच्या देखरेखीत ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे घरी आल्यावरही साधारणत: ३ दिवस शरीराला स्थिर होण्यासाठी वेळ द्या. तसेच आहाराची देखील योग्य काळजी घ्या. यासाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

० कोणत्या रुग्णांनी लिव्हर ट्रान्सप्लांट करू नये..?

ह्रदयविकार, कर्करोग, छातीचे वा पोटाचे आजार असलेल्या रुग्णांनी हि शस्त्रक्रिया करू नये. कारण अनेकदा यकृतामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झाल्याने शस्त्रक्रिया करुनदेखील यकृत पूर्ण काम करु शकत नाही.