| |

गळू म्हणजे काय?; जाणून घ्या प्रकार, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गळू हा एक त्वचाविकार आहे. हा विकार स्टॅफिलोकॉकस (staphylococcus) अपभ्रंशित नाव स्टॅफ या जीवाणूमुळे होतो. सामान्यपणे २५% लोकांच्या नाक, तोंड, जननेंद्रिये इ. ठिकाणी हा जीवाणू आढळतो. पण तो सगळ्यांच्या बाबतीत उपद्रवी नसतो. अनेकदा जमिनीच्या संपर्कात असल्याने पायाला याचा संसर्ग जास्त प्रमाणात होतो हे आढळून आले आहे. तुमच्या त्वचेवर कुठेही अगदी लहानसा छेद असेल तर त्यातून हा जिवाणू सहज शरीरात शिरतो. आज आपण याच विकाराविषयी जाणून घेणार आहोत. यात आपण गळूचे प्रकार, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेणार आहोत.

गळूचे प्रकार

१) बॉईल्स – स्टॅफ संसर्गाचा सगळ्यात सामान्य प्रकार म्हणजे बॉईल्स. या विशिष्ट पुटकुळ्या असतात. यांमध्ये पू तयार होतो. हे इन्फेक्शन पसरल्यामुळे त्वचा लाल होते. सूज चढते. या पुटकुळ्या फुटल्या तर त्यातून पू बाहेर येतो आणि जखम होते. बहुतेकदा बॉईल्स काखांमध्ये आणि जननेंद्रियांच्या आजूबाजूला आढळून येतात.

२) इम्पेटीगो – या प्रकारात शरीरावर वेदनादायक पुरळ उठतात. यात मोठमोठे फोड अंगावर येऊन त्यावर मधाच्या रंगाच्या खपल्या दिसतात. इम्पेटीगो अतिशय वेदनादायी असतो.

३) सेल्यूलाईटीस – या प्रकारात विकाराचा संसर्ग आपल्या त्वचेच्या सगळ्यात खोलवर असणाऱ्या थरात जातो. यामध्ये त्वचेतून बाहेर पडणाऱ्या स्रावामुळे ती जागा लाल होते आणि त्यावर सूजदेखील चढते.

४) स्टॅफिलोकोकल स्केल्ड स्किन सिंड्रोम – यात निर्माण होणारी विषद्रव्ये पुढे जाऊन स्टॅफिलोकॉकल स्केल्ड स्किन सिंड्रोम निर्माण करतात. याचा परिणाम बहुतांश लहान मुलांवर होतो. यात ताप, बारीक पुरळ ही लक्षणे आढळतात.

लक्षणे

– स्टॅफ इन्फेक्शनमुळे अन्न विषबाधा होते. याची लक्षणे लगेच दिसतात. तशीच हि लक्षणे लवकर नाहीशीदेखील होतात.

– ह्या लक्षणांमध्ये मळमळ आणि उलटी, हगवण्, डीहायड्रेशन, लो बीपी यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

– ताप आणि लो बीपी ही हि प्रमुख लक्षणं आहेत.

स्टॅफ बॅक्टेरियाच्या काही नवीन स्ट्रेनमुळे निर्माण होणारी विषद्रव्ये मात्र अनेकदा आणीबाणीची, गंभीर परिस्थिती निर्माण करतात. यामुळे

– अचानक उच्च ताप,

– मळमळ आणि उलट्या,

– हातावर उन्हात रापल्यासारखे दिसणारे बारीक पुरळ,

– स्नायूंच्या वेदना,

– डायरिया,

– पोटदुखी

० गळू होण्याची कारणे – स्टॅफ जीवाणूची जणू वाहक असतात. हे जीवाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतात. टॉवेल, अंथरूण-पांघरुणं यांमधून हा जीवाणू सहज संक्रमित होतो. हा जीवाणू कोरडे हवामान, अतिउष्ण- अतिथंड तापमान अशा कोणत्याही वातावरणात किंवा पोटातील आम्लातही जिवंत राहतो. यामुळे एकमेकांच्या वापरलेल्या वस्तू वापरणे गळू होण्यामागील मुख्य कारण आहे. तसेच अस्वछता देखील गळू होण्याचीच कारण आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

१) बाथरूमचा वापर केल्यानंतर किमान २० सेकंदांपर्यंत हात साबणाने स्वच्छ धुणे.

२) हाथ धुतल्यानंतर डिस्पोजेबल टॉवेलने कोरडे करून नंतर दुसऱ्या कोरड्या टॉवेलने पुसून घेणे.

३) जखम झाल्यास व्यवस्थित झाकणे. यासाठी जखम व्यवस्थित स्वच्छ करून कोरड्या बँडेजच्या साहाय्याने भरेपर्यंत झाकून ठेवणे.

४) कंगवा, रुमाल, टॉवेल अशा वैयक्तिक गोष्टींची दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीबरोबर अदलाबदल प्रामुख्याने टाळा. स्वतः देखील दुसऱ्याच्या अश्या कोणत्याही वस्तू वापरू नका.

५) कपडे, अंथरूण- पांघरूण नियमितपणे स्वच्छ धुणे.

६) ओले कपडे घालणे टाळा.

७) अन्नाचे तापमान ६० डिग्रीपेक्षा जास्त वा ४ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी ठेवणे. उर्वरित अन्न शक्य तितक्या लवकर फ्रिजमध्ये ठेवणे.