| |

‘Black Food’ म्हणजे काय? आणि त्याचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या आहारामध्ये ताज्या भाज्या आणि फळांचा वापर करावा असे अनेकदा डॉक्टर्स सांगत असतात. कारण पालेभाज्या खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढ होते तर, फळे खाल्ल्याने भरपूर न्यूट्रिशन्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात. मात्र, काही पदार्थ असे असतात ज्यांचा काळा रंग पाहून आपण ते खाणे टाळतो. कारण, त्यांचा आरोग्यासाठी किती फायदा आहे हे आपल्याला माहितीच नसते.

मुळात Black Food म्हणजे ज्या अन्नपदार्थांचा बाह्य रंग काळा असतो. महत्वाची बाब अशी कि हे रंगाने काळे असणारे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यांच्या काळ्या रंगातच आरोग्यासाठी फायदेशीर पोषक घटक दडलेले असतात. डायबिटीज, हृदयरोग, कॅन्सर यांसारख्या आजारात हे पदार्थ विशेष लाभदायक असतात.

१) काळा चहा (कोरा चहा) – काळ्या चहामध्ये पॉलीफेनोल्स असते. जे डेड सेल्स कमी करते आणि फ्री रॅडिकल्स काढण्यासाठी मदत करते. शिवाय, संशोधनानुसार कोलेस्ट्रॉल कमी करणे, लठ्ठपणा कमी करणे, डायबिटीस यासारख्या आजारांमध्ये काळा चहा अत्यंत लाभदायक आहे.

२) काळा लसूण – सफेद लसणाबद्दल आपण बरेच काही ऐकले असाल मात्र काळ्या लसणाच्या फायद्यांबाबत कमी लोक जाणतात. या लसणामध्ये ऍन्टिऑक्सिडंट आणि व्हिटॅमीन सी असते. जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. शिवाय काळा लसूण खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. इन्फेक्शन, त्वचारोग आणि कॅन्सरसारख्या आजारावरही काळा लसूण फायदेशीर आहे.

३) काळे तांदूळ – काळ्या तांदळात एंथोसायनिन मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरावर येणारी सूज कमी होते. तर तांदळाच्या वरच्या भागात अतिशय प्रमाणात पोषक घटक असतात. मात्र तांदळाला पॉलिश केल्याने हे पोषक घटक कमी होतात. मात्र काळे तांदूळ पॉलिश केले जात नाहीत. त्यामुळे यामध्ये फायबर सारखे अनेक पोषक घटक समाविष्ट असतात. ज्याचा उपयोग मधुमेह प्रकार २ चा त्रास कमी करण्यात होतो. शिवाय वजन कंट्रोल करण्यासाठी आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील काळे तांदूळ उपयोगात येतात.

४) काळे अंजीर – यामध्ये आढळणाऱ्या पोटॅशियममुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. शिवाय यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचन संदर्भातील आजार कमी होऊन वजन कमी होते. इतकेच नव्हे, तर काळ्या अंजिरात कॅन्सरशी लढण्याची क्षमता असते.

५) ब्लॅकबेरी – अनेकजण ब्लॅकबेरी जास्त खात नाहीत. मात्र ब्लॅकबेरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ब्लॅकबेरीमुळे शरीरावरची सुज कमी होते. शिवाय मासिक पाळीचा त्रास असणाऱ्या स्त्रियांसाठी ब्लॅकबेरी फायदेशीर आहे. याच्या सेवनाने त्वचेचा पोत सुधारतो. मुख्य म्हणजे, शरीरात कॅन्सर पेशींच्या वाढीवर देखील ब्लॅकबेरी नियंत्रण करण्यास सक्षम असते.