| |

ब्रेन फॉग म्हणजे काय?; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि घ्यावयाची खबरदारी

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ब्रेन फॉग म्हणजे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता प्रभावित होणे. या आजारात माणसाच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याला शब्द सापडत नाहीत. सोप्प्या भाषेत सांगायचं तर एका प्रकारे मेंदू काम करणे बंद करतो. हा आजार कोरोनातून बऱ्या झालेल्या २८% रुग्णांमध्ये दिसून आला आहे. शिवाय हा आजार प्रामुख्याने त्या लोकांमध्ये दिसतो ज्यांचा बराच काळ तब्येतीच्या कारणांमुळे रुग्णालयात गेला आहे. जे रुग्ण ऑक्सिजन आणि औषधांवर होते. यात स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रतेचा अभाव, कामात लक्ष न लागणे, माहिती समजण्यात अडचण, थकवा आणि विविध प्रकाराचे विचार डोक्यात येणं इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊयात या आजाराविषयी इतर माहिती.

० ब्रेन फॉगची लक्षणे – ब्रेन फॉगमुळे व्यक्तीच्या वागण्यात झपाट्याने बदल होतो. यात प्रामुख्याने खालील लक्षणे दिसतात.

१) कोणतेही काम न करता देखील सतत शारीरिक थकवा

२) कोणत्याही कामात मन न लागणे.

३) चिडचिड होणे.

४) नैराश्य वाढणे.

५) सतत डोकेदुखी.

६) अनिद्रेचा त्रास.

७) विस्मरण होणे.

८) रक्त तपासणीत साखर वा थायरॉईडचे असंतुलन

९) मूत्रपिंडाच्या कार्यात खराबी

१०) संसर्ग होणे.

 

० ब्रेन फॉगची कारणे –

१) झोपेचा अभाव

२) डिजिटल स्क्रीनचा अधिक वेळ वापर करणे.

३) शरीराच्या अंतर्गत भागांमध्ये सूज येणे.

४) रक्तातील साखरेची पातळी वर -खाली होणे.

५) मधुमेह, हायपर थायरॉईड, नैराश्य, अल्झायमर आणि अॅनिमियासारखे आजार असणे.

६) कर्करोगाच्या उपचारात दिल्या जाणाऱ्या केमोथेरपीतील औषधे

७) अधिक थकवा सिंड्रोमची स्थिती ६ महिने वा त्याहून अधिक काळ टिकून राहणे.

८) ठराविक औषधांच्या सेवनामुळेदेखील ब्रेन फॉग होऊ शकतो.

 

० बचावासाठी घ्यावयाची खबरदारी

१) आहारात अमिनो अॅसिड, जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा नियमित समावेश असणे.

२) दुपारी कॅफीनयुक्त पेय (चहा, कॉफी) घेऊ नका.

३) मद्यपान आणि धूम्रपान टाळा.

४) दररोज १५ मिनिटे सूर्यप्रकाश घ्या.

५) नियमित व्यायाम करा.

६) लक्षणे पाहता एक्स – रे, सीटी स्कॅन, एमआरआय, अॅलर्जी चाचणी इत्यादीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.