what is exactly mouth ulcer ?

तोंड येणे म्हणजे नेमके काय ?

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन ।  अनेक वेळा आपल्या आहारात वेगळ्या पदार्थाचा समावेश झाला असेल, तर त्यावेळी तोंड येण्याच्या समस्या या जास्त प्रमाणात जाणवतात. ज्यावेळी तापाचे प्रमाण आपल्या शरीरात खूप जास्त असेल. एखाद्या आजारानंतर जसे ताप येणे किंवा हगवण अश्या समस्यांना सामोरे जावे लागते. तोंड येण्याची समस्या म्हणजे त्या वेळेस जीभ लाल होते. तर कधी कधी आपल्या जिभेवर काही प्रमाणात पुरळ यायला सुरुवात होते. अश्या वेळी आपल्या जिभेवर फोड यायला सुरुवात होते.

तोंड येणे म्हणजे आपल्या जिभेवर जिभेचा दाह होणे होय. जीभ किंवा तोंडाच्या आतील त्वचेचे बळ कमी झाल्याने त्या त्वचेचा दाह होतो. याचे मुख्य कारण म्हणजे ‘ब’ जीवनसत्त्वाचा अभाव होय. सतत तोंड येण्याचे कारण म्हणजे आपल्या आहारात सतत चहाचे प्रमाण हे जास्त असणे होय, अनेकांना सतत चहा पिणे , तंबाखू खाणे , पानमसाला खाणे, विडी ओढणे , सिगारेट पिणे , स्टंट्स तोंडात सुपारी घेऊन बसने अश्या सवयीनमुळे आपल्याला तोंड येणे या समस्या जास्त प्रमाणात जाणवतात.

आपल्या शरीरात आमांश, जंत, आतड्यांच्या आजारात आतड्यातून अन्नाचे शोषण योग्य न झाल्याने देखील ‘ब’ जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊन तोंड येते. बद्धकोष्ठाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींमध्येही वारंवार तोंड येते. शरीरात उष्णेतेचे प्रमाण जर जास्त असेल तरीही हा त्रास खूप जास्त प्रमाणात जाणवायला सुरुवात होते. सतत तोंडाला उष्णता जर जास्त जाणवत असेल तर त्यामुळे तोंडावर आणि जिभेवर वारंवार फोड येतात . त्यामुळे पांढरे पट्टे जाणवायला जास्त सुरुवात होते. पांढरे चट्टे त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता हि जास्त असते. जर आपल्याला सतत तोंड येत असेल तर त्यावेळी आपल्या जिभेवर जाईच्या पानांचा वापर हा केला जाऊ शकतो. जाईची पाने सतत चघळल्याने तुमच्या तोंड येण्याच्या समस्या काही प्रमाणात कमी कमी होऊन जातील.