| |

एच आय व्ही एड्स काय आहे?; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि बचावासाठी टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एच आय व्ही (Human Immunodeficiency Virus – HIV) हा एक वायरस आहे. ज्याला एड्स (Acquired Immuno Deficiency Syndrome) म्हणून देखील ओळखले जाते. हा वायरस आपल्या शरीरातील पेशींवर हल्ला करतो आणि शरीराच्या रोग प्रतिकारक क्षमतेला हानी पोहचवतो. यामुळे रुग्णाची कोणत्याही संक्रमणापासून लढण्याची शक्ती अतिशय मात्रेत कमकुवत होते. हा व्हायरस हळूहळू शरीरातील सर्व पांढऱ्या पेशी (CD 4) नष्ट करतो. त्यामुळे या रोगावर वेळीच औषधोपचार केला नाही तर CD 4 पेशींवर संपूर्णपणे ताबा मिळवून याच्या अनेक प्रती तयार होतात. यामुळे रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर आणि नाजूक होते. यात रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते.

सध्या भारतात जवळपास २३ लाख ५० हजारहुन अधिक HIV रुग्ण आहेत. हे आकडे पाहून भारतातील एच आय व्ही एड्स’ची हि भयावह स्थिती लक्षात येते. हा वायरस झपाट्याने वाढण्याची करणे म्हणजे, HIVने संक्रमित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित करणे वा संक्रमित व्यक्तीला वापरलेले इंजेक्शन दुसऱ्या व्यक्तीसाठी पुन्हा वापरणे. आजच्या या लेखात आपण या रोगाची लक्षणे आणि कारणे जाणून घेणार आहोत. यासह आपला बचाव करण्यासाठी काय करावे हे हि जाणून घेणार आहोत.

० एचआयव्ही एड्स’ची लक्षणे – एच आय व्ही’ची लक्षणे संक्रमणाच्या टप्प्यानुसार वेगवेगळी असतात. या रोगाचे प्रामुख ३ टप्पे आहेत.
१) अॅक्युट प्रायमरी इन्फेक्शन
२) क्लिनिकल लेटेंसी
३) एड्स.
अनेक रोग्यांना सुरुवातीला आपल्या अवस्थेबद्दल कोणतीही कल्पना वा माहीत नसते. हणूनच जाणून घेऊयात एचआयव्ही एड्स’ची लक्षणे.
– सतत ताप येणे जाणे.
– गळा/घसा खराब होणे.
– शरीरावर विचित्र लालसर पांढरे चट्टे येणे.
– अगदी हलक्या व थोड्या कामानंतर थकवा जाणवणे.
– तीव्र डोकेदुखी होणे.
– वजन कमी होणे.
– विनाकारण तणाव, चिंता आणि भीती वाटणे.
– जेवल्यानंतर लगेच उलटी होणे.
– नेहमी सर्दी, खोकला आणि कफ असणे.

० एचआयव्ही एड्स होण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे:-

१) लैंगिक संबंध – आधीपासून एचआयव्हीने संक्रमित असलेल्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध बनवल्याने संक्रमित व्यक्तीचे रक्त, वीर्य अथवा योनी स्त्राव आपल्या शरीरात जातो. यामुळे एचआयव्ही होऊ शकतो. शिवाय योनी, गुदाद्वार व मुख मैथुन यांमुळे देखील एचआयव्ही एड्सचे संक्रमण पसरते.

२) इंजेक्शन – जर एचआयव्ही संक्रमित व्यक्तीला वापरलेली इंजेक्शनची सुई कोणत्याही इतर चांगल्या व्यक्तीला वापरण्यात आली तर साहजिकच एचआयव्ही पसरतो.

३) रक्त संचरण – रक्त संचरण अर्थात संक्रमित व्यक्तीचे रक्त चांगल्या व्यक्तीच्या शरीरात सोडल्याने एचआयव्ही होतो.

४) गर्भावस्था आणि स्तनपान – एखादी स्त्री एचआयव्ही संक्रमित असेल तर तिच्या बाळाला गर्भातच एचआयव्हीचे संक्रमण होऊ शकते. शिवाय स्तनपानाद्वारेदेखील मुलाला एचआयव्ही होऊ शकतो.

० एचआयव्हीपासून स्वतःचा बचाव कसा करावा ?
– अजूनतरी एचआयव्हीवर प्रतिबंधात्मक लसीचा शोध लागलेला नाही. त्यामुळे या रोगापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दानंदीं सवयींमध्ये बदल करणे हा यावरील एकमेव उपाय आहे. यासाठी खालील गोष्टींचे कटाक्षाने पालन करा.
* असुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्याआधी स्वतःची व आपल्या साथीची एचआयव्ही टेस्ट करा. कारण असुरक्षित लैंगिक संबंध हेच एचआयव्हीचे मुख्य कारण आहे. म्हणून संभोग करताना कंडोमचा वापर करावा. असुरक्षित व एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत संबंध ठेवणे टाळा.
* शारीरिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.
* डॉक्टरकडून इंजेक्शन घेताना स्वच्छ आणि नवी इंजेक्शन सुई असल्याची खात्री करून घ्या.