| | |

‘इंटरमिटेंट फास्टिंग’ म्हणजे काय?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे निरोगी जीवनशैलीसाठी संपूर्ण दिवसभरातील ठराविक तास उपाशी राहणे वा उपवास करणे. आजकाल एखाद्या डाएटप्रमाणेच वजन कमी करण्यासाठी हा एक प्रभावी प्रकार म्हणून प्रचलित होताना दिसत आहे. परंतु यात दिवसातील ठराविक तास कडक उपवास करणे आवश्यक आहे. हा पण एक आहे कि उपवास करण्याची वेळ तुम्ही सोयीनुसार ठरवू शकता. या फास्टिंगच्या प्रकारात तुम्ही काय खाता यापेक्षा कधी खाता हे महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊयात इंटरमिटेंट फास्टिंगविषयी अन्य महत्वाची माहिती.

० इंटरमिटेंट फास्टिंगचे प्रकार –

१) सोळा तासांचे फास्टिंग – यात सोळा तास उपाशी राहावे लागते. सकाळी आठ वाजता नाश्ता केला तर थेट सायंकाळी चार वाजताच खायचे. त्यानंतर पुन्हा सकाळी आठ वाजता नाश्ता करू शकता.

२) पाच दिवस मनाप्रमाणे दोन दिवस डाएटप्रमाणे फास्टिंग – यात आठवड्यातील पाच दिवस मनाप्रमाणे खाण्याची सूट असते. मात्र उरलेल्या दोन दिवसात ठराविक आहारच करणे अनिवार्य आहे. ठराविक कॅलरी मिळतील इतकाच आहार या दोन दिवसांत घ्यावा. आठवड्यातील हे दोन फास्टिंगचे दिवस सोयीप्रमाणे ठरवता येतात.

३) एक दिवस आड फास्टिंग – यात दररोज उपवास करण्याऐवजी एक दिवस आड उपाशी राहावे. ज्या दिवशी उपवास नाही त्या दिवशी आवडीचे पदार्थ खा. मात्र उपवासाच्या दिवशी ठराविक वेळेनुसार आणि मर्यादित पदार्थच खा.

४) याचप्रमाणे २४ तास, ३६ तास, दिवसभरात एकच वेळ जेवणं अशा प्रकारेही इंटरमिटेंट फास्टिंग करता येते.

० इंटरमिटेंट फास्टिंगचे फायदे –

१) वाढते वजन झपाट्याने कमी होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि बेली फॅट कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग नक्कीच फायद्याचे आहे.

२) ह्रदयाचे आरोग्य राखण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, निरोगी जीवनशैलीसाठी, सुदृढ शरीरासाठी इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे उत्तम उपाय. मात्र जेवढं झेपेल तेवढंच करा, म्हणजे झालं.

० इंटरमिटेंट फास्टिंग करताना घ्यावयाचा आहार.
– इंटरमिटेंट फास्टिंग करताना फायबरयुक्त पदार्थ, फळं, ज्युस, कमी कॅलरीयुक्त पदार्थ, प्रोटिन्सयुक्त पदार्थ आणि जास्तीत जास्त पाणी, जलयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

० इंटरमिटेंट फास्टिंग कुणी करू नये?
– इंटरमिटेंट फास्टिंग हा एक प्रकारचा कडक उपवास आहे. त्यामुळे ज्यांचे वजन मुळातच कमी आहे, लहान मुलं, वयात येणारे मुलं मुली, वृद्ध मंडळी, गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रिया, आजारी व्यक्ती, रक्तदाबाची समस्या असलेली माणसं यांनी हे मुळीच करू नये. कारण यामुळे त्यांच्या शरीरावर बराच काळ उपाशी राहील्यामुळे दुष्परिणाम होतात.