Multiple Organs Failure
|

मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजे काय?; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण अनेकदा मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमूळे निधन झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. पण तुम्हाला माहित आहे का याचा नक्की अर्थ काय आहे. तर मित्रांनो, आज आपण या लेखात मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजे काय हेच जाणून घेणार आहोत. याशिवाय हि शारीरिक स्थिती का निर्माण होते आणि याचा काय परिणाम होतो हेदेखील आपण जाणून घेणार आहोत.

० मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजे काय?

जेव्हा व्यक्तीच्या शरीरातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक अवयव एकाचवेळी काम करणं थांबवतात, त्या स्थितीला मल्टिपल ऑर्गन फेल्युअर किंवा मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम (MODS) असे म्हणतात. अगदी सोप्प सांगायचं झालाच तर एकापेक्षा जास्त अवयव निकामी होणे वा काम करणे बंद होणे. अशा परिस्थितीत, शरीराच्या अनेक भागांसह रोगांपासून संरक्षण करणाऱ्या आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होतो. परिणामी संबंधित रुग्णाची परिस्थिती आहे त्याहून अधिक गंभीर होते.

० मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होण्याची कारणे

- मोठा आघात
- मोठी शस्त्रक्रिया
- बर्न्स/ ऍसिड अटॅक
- स्वादुपिंडाचा दाह
- मानसिक धक्का
- फुफुसाचा त्रास
- रक्ताभिसरण प्रक्रियेत अडचण
- स्वयंप्रतिरोधक रोग
- तीव्र संसर्ग बाधा
वरील प्रत्येक कारण हे मल्टिपल ऑर्गन फेल्युअरसाठी कारणीभूत आहे.

० मल्टिपल ऑर्गन फेल्युअर’ची लक्षणे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्णाच्या अंतर्गत अवयवांवर किती प्रमाणात परिणाम झाला आहे, त्यानुसार त्याची लक्षणं सर्व रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसतात. त्यातील काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे:-
- दिवसभर लघवी न होणे
- श्वास घेण्यास अडचण येणे
- स्नायूंमध्ये प्रचंड वेदना होणे
- शरीरात थरकाप भरणे
वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.

० मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमध्ये काय होते?

मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमध्ये हिमॅटोलॉजिक, इम्‍युन, कार्डियोव्हॅस्क्युलर, रेस्‍पिरेटरी आणि एंडोक्राइन सिस्‍टीमवर थेट परिणाम होतो. थोडक्यात शरीराच्या सर्व महत्त्वाच्या यंत्रणांवर विपरीत परिणाम होतो आणि रुग्णाची स्थिती खालावते. दरम्यान रुग्णाला एकाच वेळी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कारण या स्थितीत हृदय, फुफ्फुस, किडनी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या अवयवांवर थेट विपरीत परिणाम होतो आणि यानंतर रुग्णाची प्राथमिक स्थिती खालावते. परिणामी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

० मल्टिपल ऑर्गन फेल्युअरचा सर्वाधिक धोका कुणाला?

मल्टिपल ऑर्गन फेल्युअरचा सर्वाधिक धोका दोन प्रकारच्या रुग्णांना असतो. ज्यामध्ये कमकुवत रोग प्रतिकार शक्ती असलेले लोक आणि कोणत्याही प्रकारची अंतर्गत दुखापत नसणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा रुग्णांची वेळोवेळी तपासणी करून त्यांना काही विशेष खबरदारी घेण्यास सांगितलं जातं. रुग्ण आधीच एखाद्या आजाराशी झुंज देत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाला जर एकापेक्षा जास्त आजार असतील तर त्याच्यावर डॉक्टरांच्या (doctor) देखरेखीखाली उपचार केले जातात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *