| | |

नाकाचे हाड वाढणे म्हणजे काय?; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि निदान

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याला जर निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगायचे असेल तर यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यात आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची निगा राखणे यास प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अनेकदा आपण वरवरची काळजी घेतो पण सविस्तर लक्ष देत नाही. जसे कि नाक. नाकाशी संबंधित कितीतरी अश्या समस्या असतात ज्यांच्याकडे आपण मुद्दाम दुर्लक्ष करतो आणि यानंतर या समस्या गंभीर स्वरूप धारण करतात.

आपल्या नाकाच्या उजव्या आणि डाव्या नाकपुडीच्यामध्ये पातळ हाडापासून बनलेले नांसल सेप्टम अर्थात नाकाचा पडदा असतो. काहीवेळा या नाकाच्या पडद्याचे हाड वाकडे होते. याला बोलीभाषेत ‘नाकाचं हाड वाढणे’ असे म्हणतात.आज आपण याच त्रासाविषयी जाणून घेणार आहोत. अनेकदा या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास नाकाचे दुखणे वाढते. इतकेच काय तर नाकाचा आकारही बदलतो. यानंतर शस्त्रक्रिया आणि विविध औषधोपचार करावे लागतात. म्हणूनच यासाठी आपण जाणून घेणार आहोत नाकाचे हाड वाढण्याची कारणे, लक्षणे आणि निदान:-

० कारणे 

१) जन्मावेळी नाकाच्या हाडावर दाब आल्यामुळे नाकाचे हाड वाढण्याची शक्यता असते.

२) एखाद्या अपघातात नाकाला मार बसल्यामुळे, नाकाचे हाड वाढू शकते.

३) एखादा जोरदार फटका वा अपघात यांमुळे नाकाचं हाड फ्रॅक्चर झाल्यास ते वाकले तर नाकाचे हाडं वाढते.

४) मार्फन्स सिंड्रोमसारखे जन्मजात आजार असल्यासही नाकाच्या पडद्याचे हाड वाकडे होते आणि वाढते.

 

० लक्षणे 

१) श्वास घेण्यास त्रास होणे.

२) वारंवार सर्दी होणे.

३) दोन्ही नाकपुड्या बंद होणे वा नाक चोंदणे.

४) नाकातून सतत पाणी येणे.

५) नाक दुखणे.

६) वारंवार शिंका येणे.

७) सायनस इन्फेक्शन होणे.

८) डोकेदुखी होणे.

९) नाकातून रक्त येणे.

१०) नाकात जखम होणे.

११) कोणतीही एक नाकपुडी कोरडी पडणे.

१२) झोपले असताना घोरण्याचा त्रास होणे.

० निदान
– नाकातून श्वास घेण्यास त्रास होत असेल वा वर दिलेली कोणतीही लक्षणे आढळल्यास कान- नाक- घसा तज्ज्ञ (ENT स्पेशालिस्ट) डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासाचे निदान व उपचार करून घ्यावेत.