| |

पानफुटी म्हणजे काय आणि त्याचा आरोग्याशी काय संबंध?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा पानफुटी वनस्पतीबद्दल तुम्ही ऐकले असेल. पण पानफुटी नक्की काय आहे? हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचा. पानफूटी हे एक सहज आढळणारे एक लहान रोपटे आहे. अनेक लोक आपल्या बागेत आणि घरातील गॅलरीत कुंड्यांमध्ये हि वनस्पती लावतात. पानफुटी वनस्पतीला हिन्दी भाषेत ‘पत्थरचट्टा’ तर इंग्रजी भाषेत Bryophyllum Pinnatum असे म्हटले जाते. पानफुटी रोप हे अगदी नावाप्रमाणेच पानातून उगते. याचे कोणतेही बी नसते पण पानफूटीचे रोप त्याच्या पानाला मातीत लावल्यावर उगते. पानफूटीचे रोप आणि पाने अगदी सहज मिळतात. फार कमी कालावधीत हे रोप वाढते व त्याला मोठमोठी पाने येऊ लागतात. हि वनस्पती केवळ शो साठी वापरात येत नाही. तर पानफुटी आरोग्यासाठीही लाभदायक आहे. जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कि, पानफुटीचा आरोग्याशी काय संबंध असेल? तर याचे उत्तर आज आम्ही देऊ. फक्त त्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० पानफुटी’चे उपयोग आणि फायदे – आयुर्वेदात पानफुटी च्या सेवनाचे विशेष नियम आहेत. पानफुटीची केवळ २ पाने तोडून, पाण्याने स्वच्छ करून सकाळी रिकामी पोटी गरम पाण्यासोबत खा. याशिवाय पानफुटीच्या पानांना कच्चे बारीक चावून खा किंवा पानांना तोडून त्यांची भाजी, पकोडे बनवून खा. कोणत्याही स्वरूपात हि पाने लाभदायी आहेत. अनेक रोगांवर पानफुटी एखाद्या आयुर्वेदिक वनस्पती प्रमाणे मदत करते.

१) किडनी स्टोन (मुतखडा) – पानफुटी सेवन मुतखडा बरा करण्यासाठी मदत करते. यामुळे पानफुटी मुतखडा बरा करणारी संजीवनी म्हणून ओळखली जाते. यासाठी एक विशेष औषधी तयार केली जाते.
० सामग्री – ५ मिली.पानफुटीच्या पानांचा रस, २ ग्रॅम मध
० कृती – पानफुटीच्या पानांचा रस तयार करा. हा रस कोणत्याही प्रकारच्या मुत्रविकारांवर प्रभावी आहे. पुरुषांनी या औषधीचा वापर करताना पानफुटीच्या रसात मध मिसळून हा काढा दिवसातून दोन वेळा प्यावा.

२) शरीरावरील फोड आणि सूज कमी होते – पानफुटीच्या पानांना हलके गरम करावे. गरम केलेल्या पानांचा लेप बनवून हा लेप शरीरावर आलेले फोड, लाल झालेली त्वचा आणि सुज असलेल्या भागावर लावा. पानफूटीचा हा लेप शरीरावरील फोड, चट्टे, सुज आणि जखम लवकर भरून काढते.

३) उच्च रक्तदाबावर नियंत्रण – पानफुटीच्या पानांचा अर्क हायपरटेन्शन- हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबावर नियंत्रण आणण्यास मदत करतो. यासाठी पानफुटीच्या पानांना बारीक करून त्याचा अर्क काढा आणि दिवसातून ५ ते १० याचे सेवन करा. हा उपाय उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवतोच शिवाय रक्‍त शुद्धदेखील करतो.

४) डोकेदुखी होईल कमी – डोकेदुखीवर पानफुटी लाभकारी आहे. यासाठी पानफुटीच्या पानांना बारीक कुटून घ्या आणि हा लेप माथ्यावर लावा. पानफुटी वनस्पतीचा हा लेप रात्रभर कपाळावर लावून झोपल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.

५) नपुंसकता – वाढत ताण आणि बदलती जीवनशैली अश्या अनेको समस्या तयार करते ज्या नैराश्याचे कारण असू शकतात. यांपैकी एक समस्या लैगिंक धर्माशी संबंधित आहे ती म्हणजे नपुंसकता. यासाठी पानफुटीच्या पानांना बडिशेप सोबत मिसळून एक चूर्ण तयार करा. हे चूर्ण नियमित सेवन करा आणि नपुंसकत्यावर मात करा.

६) योनीतील इन्फेक्शन – योनी मार्गातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी पानफुटीच्या पानांचा काढा लाभदायी ठरतो. यासाठी पानफुटीच्या ४०-५० मिलीग्राम काढ्यामध्ये दोन ग्राम मध मिसळून याचे दिवसातून दोनदा सेवन करा. यामुळे कोणतेही योनी मार्गातील इन्फेक्शन सहज दूर होते.

७) डोळ्यांसाठी लाभदायक – डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे ,डोळे दुखणे इ. समस्यांसाठी पानफुटीच्या पानांचा रस काढून डोळ्याच्या चारही बाजूंना लावावा. यामुळे डोळ्याचे दुखणे असो किंवा इतर समस्या सहज दूर होतात.

० अत्यंत महत्वाचे – पानफुटीचा उपयोग करताना पाने न धुता वा पानांना स्वच्छ न करता वापरणे प्रामुख्याने टाळा. पानफुटी वनस्पतीचे सेवन केल्यानंतर एक तासापर्यंत काहीही खाऊ अथवा पिऊ नका. गरजेपेक्षा अधिक पानफुटीचे सेवन करू नका.