| |

‘पॅराथिसिया’ म्हणजे काय?; जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एकाजागी सतत बसून काम करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत नुकसानकारक कार्य आहे. पण ऑफिसमध्ये बसल्या जागीच काम असेल तर त्याला पर्याय तरी काय? मात्र शरीराची अपुरी हालचाल हि आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे शरीर जड होणे, शरीराच्या विविध अंगांना मुंग्या येणे अशी स्थिती निर्माण होते. या स्थितीला ‘पॅराथिसिया’ असे म्हणतात. हा त्रास फार गंभीर नसला तरीही दुर्लक्ष करण्याइतका साधासोप्पा नाही. त्यामुळे आज आपण या त्रासासंबंधित कारणे आणि लक्षणे जाणून घेणार आहोत. यामुळे तुम्हाला ‘पॅराथिसिया’ असल्याचे निदान होईल आणि वेळीच उपचार देखील घेता येतील. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० कारणे

१) व्हिटॅमिन B12 ची कमतरता – शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल तर ती शारीरिक त्रासांना आमंत्रण देते. ‘पॅराथिसिया’ अर्थात मुंग्या येणे हा त्रास याअभावी होऊ शकतो.

२) अपुरा रक्तपुरवठा – शरीरात अपुरा रक्त पुरवठा झाल्यास हा त्रास संभवतो. मुख्य म्हणजे अपुरा रक्त पुरवठा होण्याची विविध कारणे असतात हि वेळीच ओळखून त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.

३) कमी हालचाल – शरीराची कमीतकमी हालचाल हे या त्रासाचे एक कारण असू शकते. कारण शरीराची हालचाल न झाल्यामुळे शरीर जड होते आणि मुंग्या येण्याची समस्या होते.

४) मायग्रेन – मायग्रेनचा त्रास असेल तर ‘पॅराथिसिया’ होतोच. कारण मायग्रेनची डोकेदुखी फार वेगळी असते. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होताना अनेक अडचणी येतात. परिणामी ‘पॅराथिसिया’चा त्रास संभवतो.

५) मधुमेह – शरीरात इन्सुलिनचे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे आणि रक्तपुरवठा खंडीत झाल्यामुळे मधुमेहींना ‘पॅराथिसिया’चा त्रास होतो.

 

० लक्षणे

१) शरीर सुन्न होणे
– अनेकदा एकाच जागी बसल्यानंतर उठताना शरीराचा एखादा भाग किंवा संपूर्ण शरीर सुन्न झाल्यासारखे वाटते. अंग बधीर झाल्यामुळे उठायची ताकत जमा होत नाही. असे झाल्यास समजावे ‘पॅराथिसिया’चा त्रास आहे.

२) उठायला – बसायला त्रास होणे
– खूप वेळ बसल्यानंतर किंवा खूप वेळ उभे राहिल्यानंतर पायातील त्राण निघून जातात आणि पटकन हालचाल करता येत नाही. इतकेच काय तर एकही पाऊल पुढे टाकायला होत नाही.

३) चालताना तोल अस्थिर होणे
– पायांना मुंग्या आल्या असतील तर लवकर जात नाहीत. यामुळे साहजिकच तोल जातो. त्यामुळे कधीही तोल जातोय असा भास झाला तर आपल्याला ‘पॅराथिसिया’ आहे हे समजून जा.

४) तळपायांना खाज आल्याचा भास होणे
– पायाला मुंग्या आल्या आल्या असतील तर काही काळासाठी चालताना आणि पावलं टाकताना पायांच्या तळव्यांना काहीतरी वेगळीच जाणीव होते. अचानक खाज येते तर अचानक गुदगुल्या होतात. असे जाणवल्यास ‘पॅराथिसिया’ आहे हे समजते.

५) शॉक लागल्यासारखे होणे
– अचानक शॉक लागल्यासारखे होणे किंवा एक विचित्र शिरशिरी येणे हा भासदेखील ‘पॅराथिसिया’ असल्याचे लक्षण आहे.