| |

माणसाच्या वृद्धत्वाचे कारण तरी काय?; जाणून घ्या वैज्ञानिक कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण लहान असताना आपल्याला माहित नसते कि, आपण म्हातारे होणार आहोत. मात्र समज आल्यानंतर जेव्हा समजते कि आपणही आज्जी आजोबांसारखे म्हातारे होणार तेव्हा मात्र एक कुतूहल निर्माण होते आणि हे कुतूहल म्हणजे म्हातारे का होणार आणि कसे होणार? तुम्हालाही पडलाय का ओ असा प्रश्न..? जर हो तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि या प्रश्नाचेही उत्तर आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही माणसाकडे नाहीये पण विज्ञानाकडे मात्र आहे. लहानपण- तारुण्य- म्हातारपण हे असं चक्र आहे जे कुणालाच चुकलेलं नाही. जो जो सजीव या सृष्टीवर आहे तो तो या चक्रातून परिपूर्ण होत असतो.

विज्ञानानुसार, जेव्हा मानवी शरीर बाह्य घटक, धूळ, माती, प्रदूषण इत्यादींच्या संपर्कात येते, तेव्हा शरीराच्या गुणवत्तेमध्ये घसरण होऊ लागते. याबाबत सांगताना शास्त्रज्ञांनी काही विशेष कारणे स्पष्ट केली आहेत. हे स्पष्टीकरण आपण या लेखातून तुमच्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहोत. चला तर वृद्धत्वाचकारणे जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

१) माइटोकॉन्ड्रियात घट
– माइटोकॉन्ड्रियाला शरीराचे ऊर्जा खंड अर्थात पावर हाऊस म्हणून ओळखले जाते. हे पेशींची क्रिया नियंत्रित करतात. त्यामुळे जर माइटोकॉन्ड्रियाच्या प्रणालीमध्ये घट झाली असेल तर शरीराच्या अनेक कार्यांमध्ये आपोआपच घट होते. त्यामुळे जसजसे आपले वय वाढू लागते याचे प्रमाण कमी होते आणि आपण वृद्ध दिसू लागतो.

२) टेलोमेयरमध्ये घट
– आपल्या शरीरात नवीन पेशी तयार होत असतात ज्यामुळे शरीर तरुण दिसते. पण या पेशी सुरक्षितपणे वेगळे करण्यात क्रोमोसोमचा मोठा समावेश असतो. पेशीच्या डीएनएमध्ये सापडलेल्या क्रोमोसोमच्या टोकाला ‘टेलोमेयर’ नावाचे एक सुरक्षा कवच असते. मात्र, पेशींच्या सतत होणाऱ्या विभाजनामुळे, या टेलोमरचे प्रमाण कमी होते आणि शरीर म्हातारे दिसते. टेलोमेयरच्या विभाजनाचा परिणाम म्हणून पेशीच्या प्रतिकृती बनतात त्यामुळे व्यक्तीचे वय वाढले की त्या पेशी नष्ट होतात. परिणामी, त्वचेवर सुरकुत्या येणे, केसगळती, दृष्टीदोष आणि कर्ण बधिरता या समस्या उदभवतात.

३) स्टेम सेल्सच्या प्रतिकृतीत घट
– स्टेम सेल्स पेशीत वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींमध्ये विभाजीत होण्याची क्षमता असते. जे शरीरात दुरुस्ती यंत्रणा म्हणून काम करतात. त्यात प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, भ्रूण स्टेम सेल आणि प्रौढ स्टेम सेल. स्टेम सेल्स शरीराच्या अनेक भागांमध्ये असले तरी कालांतराने त्यांची प्रतिकृती कमी होते. परिणामी शरीराचे अवयवांची कार्यक्षमता घटते. यामुळे, सांदेदुखी, गुडघेदुखी आणि कमरेत बाक येण्याच्या समस्या उदभवतात.

४) स्टेम सेलचा विनाश होणे.
– शरीराची जीवनशैली जितकी खराब आणि तीव्र असेल तितकी स्टेम सेल या पेशींना रोगांशी लढण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. परिणामी या पेशींचा लवकर विनाश होतो आणि वृद्धत्व येते.

५) पेशींचे प्रथिने गुणवत्ता नियंत्रण
– पेशींचे कार्य कालांतराने हळू हळू आणि कमी होऊ लागते. यानंतर ते पूर्वीप्रमाणे प्रथिने शोषून घेण्यास अधिक सक्षम नसतात. परिणामी विषारी किंवा खराब प्रथिने, शरीरात प्रवेश करू लागतात. ज्यामुळे चयापचय क्रिया अधिक जलद होते आणि पेशींसाठी घातक ठरते. शरीर अधिक ताण घेऊ लागल्यामुळे अकाली वृद्धत्व, केस गळणे, थकवा जाणवणे, विस्मरण, दृष्टी कमी होणे इत्यादी लक्षणे अगदी स्पष्ट दिसून येतात.