| |

‘दही’ आणि ‘योगर्ट’ एकसारखे का वेगवेगळे?; जाणून घ्या फरक

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीयांच्या खानपान योजनेत अनेको दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे पूर्ण आहारात दूध, दही, ताक, लोणी, तूप या पाचही घटकांचा समावेश असतो. यातील दह्याचा विशेष चाहता वर्ग आहे. याच्यामध्ये अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. दह्याच्या विशेष गोडीचा धार्मिक गोष्टींमध्येही उल्लेख केल्याचे दिसते. अगदी श्रीकृष्णापासून आताच्या बालकांपर्यंत सर्वांचा आवडता दुग्धजन्य पदार्थ म्हणून दह्याला विशेष ओळख आहे.

गोडापासून तिखटापर्यंत अनेक पदार्थांमध्ये त्याचा समावेश सिद्ध आहे. इतकेच काय, तर व्हेज असो किंवा नॉनव्हेज दोन्हीत दह्याचा वापर केला जातो. भारतीय परंपरेतही दह्याला विशेष महत्व आहे. कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडताना हातावर दही साखर ठेवण्याची पद्धत आहे.

आता या दह्याचं आधुनिक रूप बाजारात पाहायला मिळते. याला ‘योगर्ट’ नावाने ओळखले जाते. ङ्कजं म्हणतात कि दही आणि योगर्ट म्हणजे एकच तर अनेकांना मात्र हा प्रश्न भेडसावत आहे कि दही आणि योगर्ट एकच का वेगवेगळे? या प्रश्नाचे उत्तर कोरा संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे. रिपोर्टनुसार, योगर्ट आणि दही हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. यातील योगर्ट हा मूळ तुर्की शब्द आहे. आपण दुधाला विरजण लावतो, त्याला शास्त्रीय भाषेत किण्वन म्हणतात. अर्थात किण्वनाची प्रक्रिया दही आणि योगर्ट या दोघांमध्येही केली जाते.

मात्र योगर्टमध्ये हि पद्धत थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाते. योगर्टमध्ये प्रामुख्याने गायीचेच दूध वापरात घेतात. यात योगर्ट बनवण्यासाठी दुधात जीवाणूंच्या मदतीने यिस्ट तयार करतात. या जीवाणूंना योगर्ट कल्चर म्हणतात. तर तापवलेल्या आणि पाश्चराईज्ड दुधात जीवाणू सोडल्यानंतर काही काळाने दुधातील लॅक्टोज आंबल्याने ते घट्ट होऊन लॅक्टिक अॅसिड तयार होते. त्यामुळे दूध घट्ट होते आणि त्याचे योगर्ट बनते. मात्र दही आणि योगर्ट या दोन्ही पदार्थांच्या चवी, कॅलरीज आणि पोषक तत्त्वांमध्येदेखील बराच फरक आहे.
– दही योगर्टपेक्षा जास्त तीव्र आम्ल अर्थात आंबट असते.
– दह्यात योगर्टपेक्षा कमी कॅलरीज असतात.
– दही हे फक्त दुधाचे असते. तर, योगर्ट निरनिराळ्या फळांच्या रसाचा वापर करूनदेखील बनवता येते.
० मात्र एक बाब या दोन्हींमध्ये अत्यंत सामान आहे ती म्हणजे दही आणि योगर्ट दोन्हींचा आहारात समावेश केला जातो आणि तो हि अगदीच आवडीने.