| |

यशस्वी गर्भधारणा आणि फर्टाइल विंडो यांचा संबंध काय?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आई होणे हि काही सर्वसामान्य बाब नाही. जगातील प्रत्येक स्त्रीकडे आई होण्याचे वरदान आहे. त्यामुळे केवळ स्त्री आई होऊ शकते. प्रत्येक स्त्रीचे आईपण हे वेगळे असते. हा एक असा काळ असतो जेव्हा स्त्रीमध्ये अनेको बदल झपाट्याने होत असतात. काही समजतात काही नकळत होतात. हे सर्व बदल त्या स्त्रीसाठी हवेहवेसे असतात. कितीही त्रासदायक असले तरीही. आईपण हि एक स्थिती नसून एक भावना आहे. प्रत्येक आईला आपले बाळ सुदृढ आणि निरोगी जन्माला यावे असे वाटत असते. पण यासाठी गर्भ धारण करतेवेळी काळजी घेणे आवश्यक आहे. आता गर्भ धारण करताना काळजी घेणे म्हणजे काय?

तर मैत्रिणींनो, गर्भ धारण करण्यासाठी योग्य काळ समजून घेणे गरजेचे असते. हा काळ म्हणजे, ओव्हुलेशन डेज. होय. आता याचा अर्थ काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अगदीच सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रियांमधील बीजांडकोश फुटून स्त्री बीज बाहेर येण्याची क्रिया. यामध्ये अत्यंत महत्वाचा कालावधी फटाईल विंडो हा असतो. पण या दिवसांमध्ये यशस्वी गर्भधारणेसाठी आपल्या पार्टनर सोबत लैंगिक संबध ठेवणे खुप गरजेचे असते. कारण यामुळेच योग्य पद्धतीने आणि लवकर गर्भ धारण करता येतो.

० फटाईल विंडो म्हणजे काय?
– गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक असलेला प्रजनन चक्रातला कालावधी म्हणजे फर्टाइल विंडो (Fertile Window) होय. शुक्राणू स्त्रीच्या शरीरात तीन दिवसांपर्यंत क्रियाशील (जिवंत) राहतो. तर बीजांडाचं आयुष्य मात्र केवळ २४ तासांचं असतं. त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर सर्वांत योग्य कालावधी म्हणजे ओव्ह्युलेशनपूर्वी ३-४ दिवसांपासून ओव्ह्युलेशननंतरच्या २ दिवसांपर्यंतचा असतो.

० वयाच्या चाळिशीनंतर ओव्ह्युलेशन आणि गर्भधारणा
– स्त्रीच्या शरीरातील बीजांडांचा दर्जा आणि संख्या यांमध्ये तिच्या वयाच्या तिशीनंतर घट होते. तर, पस्तिशीनंतर हि घट वेगाने होते. त्यानंतर मूल हवं असेल तर विविध कृत्रिम पद्धतींचा अवलंब करावा लागतो. वयाच्या चाळीशीनंतर ओव्ह्युलेशनचं सातत्य घटतं आणि वंध्यत्वाचा धोका वाढतो. यामुळे नंतर एग फ्रीझिंग, क्रायोप्रिझर्व्हेशन, एम्ब्रियो प्रिझर्व्हेशन, पीजीटीए, आयव्हीएफ, आययूआय या तंत्रांचा वापर योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली केल्यास चाळिशीतही गर्भधारणा शक्य होऊ शकते.