What is the relationship between masks and eye diseases

मास्क आणि डोळ्यांच्या आजारांमध्ये काय आहे संबध ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । कोरोना आणि मास्क हे एक प्रकारचे समीकरण बनले गेले आहे . नवीन जीवनामध्ये आपण दररोज च्या वापरात मास्क हा स्वीकारला आहे . दररोज च्या वापरात मास्क असल्याने त्याची खूप सवय झालेली आहे . कोरोनाच्या काळात मास्क चा वापर असल्याने त्याचे खूप जास्त प्रमाणात दुष्परिणाम सुद्धा जाणवायला लागले आहेत. त्यामुळे अनेकांना त्वचेचे विकार होत आहेत . तर काहींना डोळ्याच्या समस्या या जास्त जाणवत आहेत .

आरोग्यासाठी मास्क जरी योग्य असेल तरी चुकीच्या पद्धतीने घातल्यास किंवा नाक उघडे राहिल्यास उच्छ्‌वासावाटे बाहेर पडणारी उष्ण हवा डोळ्यात जाऊन डोळे कोरडे पडतात. यामुळे नैसर्गिक अश्रू वाळून डोळ्यांचा दाह होतो. मास्क बराच काळ घातल्यानंतर पापण्यांलगतचा जंतूसंसर्ग, बुब्बुळांचे होणारे नुकसान, मास्कवर राहिलेल्या साबणाच्या कणांमुळे डोळे खाजणे अशा समस्या घेऊन रुग्ण येत आहेत. कोरोना महामारीच्या काळातला ताण, काळजीमुळेही डोळ्यांच्या समस्या उद्‌वत असल्याचेही तज्ज्ञ सांगत आहेत. तसेच ज्या लोकांना थोडे चालले तर धाप वगैरे लागण्याच्या समस्या या वाढताना जाणवत आहेत .

मास्क वापरताना ते कापडी मास्क असणे गरजेचे आहे . नीट बसणारे तसेच आरामदायी कापडापासून तयार करण्यात आलेले मास्क वापरा. मास्क घालताना किंवा काढताना डोळ्यांना हात लावू नका. त्यामुळे आपल्या डोळ्यांचा दाह होण्यास सुरुवात होऊ शकते. डोळे चुरचुरत असतील तर एखादा गरम कपडा डोळ्यांवर ठेवा. किंवा पाणी वापरा. यामुळे तुम्हाला बरे वाटेल. तुमचा स्क्रीन टाइमही कमी करा. सतत मोबाइल किंवा लॅपटॉपसमोर बसल्यानेही डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाकाळात डोळ्यांबाबत सजग व्हायला हवे. आपण आपली आणि समाजाची काळजी घेण्याचे काम आपल्या स्वतःपासुन सुरुवात करा.