| | |

जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य तरी काय?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो आज आपण आयुष्याबाबत बऱ्याच अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या जाणून घेतल्यानंतर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटू शकते. आता तुम्हीच सांगा दीर्घकाळ सुखी आणि निरोगी जगायला कुणाला आवडणार नाही? तुम्हाला आवडणार नाही का? अर्थातच कुणालाही निरोगी जगायला हे आवडतंच. पण तरीही दररोज थोडी थोडी आधुनिक होत असलेली आपली जीवनशैली आणि चुकीच्या सवयी या आपल्या आयुष्याचा ऱ्हास करत असतात. पण तरीही आपण काही त्या सवयी सोडत नाही. मग काय? कसं बसं रडत खडत जगायचं आणि शेवटी काय मरायचं.

पण तुम्हाला माहित आहे का? या संपूर्ण जगात सगळ्यात जास्त काळ जगणाऱ्या लोकांमध्ये जपानी लोकांचा समावेश आहे. काय? वाटलं ना आश्चर्य? पण हे खार आहे जगात सर्वात जास्त दिर्घ आयुष्याचा आनंद जपानी लोक घेत आहेत. जपान या देशात सुमारे २३ लाख लोकांचे वय ९० वर्षाहून अधिक आहे. तर ७१,००० पेक्षा जास्त लोकांचे वय १०० वर्षापेक्षा जास्त असल्याचे रिसर्च रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तुम्हालाही जाणून घेऊ वाटतंय ना जपानी लोकांच्या दिर्घ आयुष्याचे रहस्य? मग वाट कश्याची पाहताय? हा लेख पूर्ण वाचा आणि जाणून घ्या.

० जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे कारण असणारी जीवनशैली जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) जपानी लोकांचे खाणे – सी फूड, सोयाबीन, फर्मेंटेड फूड, चहा आणि मासे हे पदार्थ जपानी लोकांच्या आहारात प्रामुख्याने खाल्ले जातात. हे लोक त्यांच्या दैनंदिन आहारात मांस, साखर, बटाटे, डेयरी प्रॉडक्ट आणि फळे कमी खातात.

२) कोणताही पदार्थ हळुहळु खाणे – जपानी लोक आपले जेवण कधीही भरभर करत नाहीत. प्रत्येक पदार्थ खाताना ते चांगल्याप्रकारे चावून आणि अगदी हळुहळु खातात.

३) खाण्यापिण्यावर नियंत्रण – जपानी लोक जेवण कितीही चविष्ट असले तरीही प्रमाणापेक्षा अधिक खात नाहीत. ते नेहमी चवीपेक्षा पोटाची काळजी घेतात. मुख्य म्हणजे खाताना छोट्या प्लेटमध्ये जेवतात. यामुळे आपण खात असलेले आधीपासूनच अधिक आहे अशी मानसिकता तयार होते.

४) चहाची आवड – जपानी लोकांना चहा अतिशय आवडतो. पण ते पारंपारिक माचा चहा पितात. यात अनेक न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज, अँटीऑक्सीडेंट असतात. यामुळे त्यांची त्वचा चमकदार आणि चांगली राहते.

५) नाश्ता – जपानी लोक नाश्ता चुकवत नाहीत. ते नियमितपणे नाश्ता करतात. या नाश्त्यात ते भात, लापशी वा शिजवलेले मासे खातात. यामुळे भूक शांत राहते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.

६) खाण्याचे योग्य प्रमाण – जपानमध्ये ’जेवण केवळ तोपर्यंत खा, जोपर्यंत तुमचे पोट ८०% पर्यंत भरत नाही’ हे एक ठरलेले तत्त्व आहे. या गोष्टीने प्रत्येक जपानी व्यक्तीकडून सक्तीने पालन केले जाते .

७) जेवल्यानंतर गोड टाळतात – आपल्याकडे जेवल्यानंतर गोड पान, आईस क्रीम नाहीतर मग स्वीट खाण्याची एक पद्धत आहे. पण जपानमध्ये लोक साखर किंवा स्वीट डिश यापासून अंतर राखतात आणि जेवणानंतर तर प्रामुख्याने या गोष्टींपासून दूर राहणे पसंत करतात.

८) जेवण शिजवण्याची पद्धत – जपानी लोक कमी शिजवलेले जेवण जास्त जेवतात. जसे कि स्टीमिंग, फर्मेंटिंग, उकड वा फ्राय फूड असे पदार्थ जपानी जास्त खातात. यातही खुप कमी तेलाचा वापर केला जातो.

९) सोयाफूड – जपानमध्ये सोयाफूडचा सर्वाधिक वापर केला जातो. जपानी लोकांच्या आहारात प्रामुख्याने सोयामिल्क, मिसो, टोफू आणि नाटो (फर्मेंटेंड सोयाबीन) यांचा वापर अधिक केला जातो.

१०) चपाती टाळा भात खा – जपानी हॉटेलच्या सर्व मेन डिशमध्ये चपाती वा ब्रेड यांची जागा भाताने घेतलेली दिसते. एखाद्याला जपानी लोकांना भात प्रचंड आवडतो असेच वाटेल. पण याचे कारण असे आहे कि, चपाती वा ब्रेड रिफाईंड पीठाने बनते यामुळे जपानी लोक ते खाणे टाळतात आणि त्याजागी फक्त भात खातात.

– तर हि आहेत जपानी लोकांच्या दीर्घायुष्याची मुख्य कारणे. आपणही आपल्या जीवनशैलीत काही बदल केले असता दीर्घायुष्याचा लाभ घेऊ शकतो. कारण आपले आयुष्य आपल्यापुरता मर्यादित नसते.