What is the significance of Chitti in medicine packets?

औषधाच्या पाकिटांध्ये असलेल्या चिट्टीचे काय आहे महत्व ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपण आपल्याला थोडा त्रास सुरु झाला तर त्यावेळी आपण लगेच मेडिकल मध्ये जाऊन औषधे घेतो , पण ज्यावेळी आपण औषधे घेतो त्यावेळी आपल्याला त्या औषधांसोबत एक चिट्टी पण असते . अश्या वेळी त्या चिट्टीचे काय महत्व आहे ते जाणून घेऊया …. का दिली जाते ती चिट्टी ?

भारतीय सरकारच्या आणि औषध नियामक प्रशासनाने बंधनकारक ठरवलेल्या नियमानुसार प्रत्येक फार्मा कंपनीला आपल्या औषधांबाबत माहिती देणे हे गरजेचे असते. प्रत्येक पेशंट ला आपण कोणत्या प्रकारची औषधे घेत आहोत याची माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यालाच ‘पेशंट इन्फॉर्मेशन पॅकेज इन्सर्ट’ असेही म्हंटल जाते. अनेक वेळा आपल्याला त्याच महत्व वाटत नाही , आणि ते कचऱ्याच्या डब्यात टाकतो. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे काही लिहलेले असते ते म्हणजे आपल्यासाठीच असते.

त्यामध्ये लिहलेल्या अनेक गोष्टीनुसार आपण कश्या सोबत काय खाऊ नये. जास्त प्रमाणात औषधें घेतले तर मात्र आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात . पोटात या औषधाचा डोस हा जास्त झाला तर त्यावेळी आरोग्यावर कोणते परिणाम हे दिसून येतात. आपण हा डोस घेत असेल तर तो किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी घेतले पाहिजे याची संपूर्ण माहिती हि आपल्याला मिळाली पाहिजे. म्हणून यामध्ये काही प्रमाणात प्रिस्क्रिबशन दिलेले असते. शेवटी ते औषध कसे आणि कुठे ठेवावे. उरलेल्या किंवा जुन्या औषधाची विल्हेवाट कशी लावावी हे लिहिलेले असते. अनेक वेळा चुकीची औषधे घेतल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे शासनाच्या नियमानुसार हि माहिती देणे आवश्यक असते.