| |

‘क्षयरोग’ म्हणजे काय?; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ‘क्षयरोग’ हा एक संसर्गजन्य विकार आहे. हा रोग ट्यूबरक्युलोसिस या विषाणूमुळे होतो. या रोगाने ग्रासलेल्या रुग्णाला अतितीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास अश्या समस्यांचा सामना करावा लागतो. क्षयरोग रुग्णाच्या फुफ्फुस, मेंदू, तोंड, घसा, यकृत आणि किडनी या अवयवांना संक्रमित करतो. क्षयरोग संसर्गजन्य रोग असल्यामुळे श्वासोच्छवासातून इतर व्यक्तीला संक्रमित करतो. खोकला आणि शिंकणे यातून या रोगाचे विषाणू हवेत पसरतात. क्षयरोगामुळे रूग्णाच्या फुफ्फुसांवर परिणाम होतो. यामुळे सतत खोकला येतो. अशा रूग्णांना लागोपाठ ३ आठवडे सुका खोकला जाणवतो. यानंतर खोकल्याचे प्रमाण अधिक होते. यामुळे २-३ आठवडे एखाद्याला सतत खोकला असल्यास त्याने क्षयरोगाची तपासणी करून निदान झाल्यास वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्या रुग्णाची प्रकृती गंभीर होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला क्षयरोगाची लक्षणे आणि उपचार सांगणार आहोत.

० क्षयरोगाची लक्षणे:-

१) ताप – ताप येणे हे क्षयरोगाचे लक्षण असू शकते. ज्या लोकांना टीबी होतो त्यांना सतत ताप जाणवतो. अशा लोकांना आधी ताप कमी असतो. मात्र योग्य उपचार घेतले नाहीत तर तीव्र ताप येण्याची शक्यता असते.

२) तीव्र खोकल्यामधून कफ आणि रक्त पडणे – क्षयरोगाचे प्रमुख लक्षण सलग २-३ आठवडे खोकला येणे. पहिल्यांद्या फक्त सुका खोकला येतो. मात्र यावर वेळीच उपचार न घेतल्यास तो बळावतो. फुफ्फुसांमधील संक्रमण वाढल्याने कफ व रक्त पडणे हा त्रास होतो. अती प्रमाणात खोकल्यामुळे आणि संक्रमित भागावर योग्य उपचार न मिळाल्यामुळे ही लक्षणे जाणवतात.

३) छातीत दुखणे – छातीत दुखणे हे क्षयरोग झालेल्या रूग्णांमधील सामान्य लक्षण आहे. बऱ्याचदा छातीत दुखत असलं तर याकडे दुर्लक्ष केलं जातं. अॅसिडिटी वा खोकल्यामुळे दुखत असेल म्हणून उपचार केले जात नाहीत. मात्र याचे गंभीर परिणाम पुढे भोगावे लागतात. क्षयरोगाचे प्रमाण वाढल्यास अशा रुग्णांना खोकल्यासोबत छातीत दुखणे वा श्वास घेण्यास त्रास होणे या समस्या जाणवतात.

४) थकवा – हे रुग्ण अती प्रमाणात अशक्त होतात. ज्यामुळे त्यांना सतत थकल्यासारखे वाटते. कोणतेही काम करण्याचा उत्साह वाटत नाही. अंगामध्ये शक्ती कमी असल्यामुळे निरूत्साही आणि सतत झोपून रहावे वाटते.

५) रात्री अंगातून घाम येणे – क्षयरोग झालेल्या रूग्णांच्या अंगातून सतत घाम येतो. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी अशा रूग्णांना खूप घाम येतो. वातावरणात थंडी असली तरी क्षयरोग झालेल्या रूग्णांना घाम येतो. एसी लावून झोपलात तरीही. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष नको.

६) थंडी वाजणे – वातावरण उष्ण असताना वा उन्हाळ्याच्या दिवसांत क्षयरोग झालेल्या रूग्णांना थंडी वाजते. त्यामुळे अचानक थंडी, ताप येणे, अंगातून खूप प्रमाणात घाम येणे अशी लक्षणे जाणवत असतील तर क्षयरोगाची तपासणी वेळीच करून घ्या.

७) भूक कमी लागणे – भूक कमी लागणे हे क्षयरोगाचे आणखी एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही दिवसांपासून भूक लागत नसेल किंवा वेळेनुसार योग्य जेवण घेऊनही तुमचे वजन झपाट्याने कमी होत असेल तर तुम्हाला क्षयरोगाची चाचणी करण्याची गरज आहे.

० क्षयरोगावर उपचार
– क्षयरोग झाल्यास सुरूवातीला डॉक्टर रूग्णाला अॅंटि बॉडीज गोळ्यांचा कोर्स देतात. शिवाय रूग्णांचे एक्स- रे काढून त्यांच्या फुफ्फुसांमधील संक्रमण तपासले जाते. ज्यावर समस्येनुसार उपचार करतात. रूग्णावर क्षयरोगासाठी उपचार कोणते करावे हे त्या रुग्णाच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असते. बऱ्याचदा आरोग्य स्थिती सौैम्य स्वरूपाची असेल तर या घरगुती, आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी उपचारही केले जातात.