| |

मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाताना कोणती काळजी घ्यावी? ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आंबा खायला कोणाला आवडत नाही. एकतर आंबा आरोग्यासाठी हितकारक असतो. शिवाय त्यात अनेक पोषक घटक असतात. मात्र त्याचा गोडवा मधुमेहाच्या रुग्णांवर परिणाम करतो अश्या समजणे हे लोक आंब्यापासून दहा पावलं लांबच असतात. पण मुळात आंबा हा एक नैसर्गिक गोडवा असलेले फळ आहे. तरीही तो खायचा कि नाही अश्या दुविधेमध्ये मधुमेहोणे ग्रासलेले रूग्ण असतात. तर चला आज जाणून घेऊयात कि खरच आंबा खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांना त्रास होतो का? आणि जर होतो तर मग त्यांनी आंबा खायचा का नाही? आणि खायचा असेल तर किती?

आंबा हे एक नैसर्गिक साखरयुक्त फळ आहे. शिवाय यात व्हिटॅमीन आणि मिनरल्स असतात. जे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फायदेशीर असते. एक कप कापलेल्या आंब्यामध्ये साधारण ९९ कॅलरी, १.४ ग्रॅम प्रोटीन, २५ ग्रॅम कार्ब, २२.५ ग्रॅम साखर,२.६ ग्रॅम फायबर असते. इतकेच नव्हे, तर ६७% व्हिटॅमीनC, १८% फोलेट, १०% व्हिटॅमीन A आणि १०% व्हिटॅमीन Eसुद्धा असते आणि कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियमदेखील मुबलक प्रमाणात असते. मात्र तरीही अनेकांना अनेक प्रश्न पडलेले असतात. मनात असूनही मग हे लोक आंबा खाणे टाळतात. त्याच्यासाठी हा लेख समर्पित.

१) ब्लड शुगरवर परिणाम – आंब्यात ९०% पेक्षा अधिक कॅलरीज असतात जे त्याच्या गोडव्यामुळेच असतात. याच कारणाने मधुमेही रूग्णांमध्ये ब्लड शुगरचे प्रमाण वाढते. मात्र आंब्यामध्ये फायबर आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात, जे ब्लड शुगरवर होणारा परिणाम कमी करतात. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी एका सीमित मर्यादेत आंबा खाणे वावगे नाही.

२) ग्लायसेमिक इंडेक्स – कोणत्याही खाण्याच्या अन्न पदार्थाचा आपल्या रक्तातील साखरेवर परिणाम हा त्याच्या ग्लाइसेमिक इंडेक्सवरून ओळखला जातो. हे प्रमाण ० ते १००च्या प्रमाणात मोजतात. साधारण ५५ पेक्षा कमी प्रमाण असणारे पदार्थ कमी साखरेचे मानले जाते. तर हे पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांना खाण्यासाठी योग्य मानले जातात. आंब्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स ५१ आहे. त्यामुळे कोणताही मधुमेह रूग्ण आंबा मर्यादितपणे खाऊ शकतो.

मात्र एक बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे कि, प्रत्येकाचे शरीर प्रत्येक पदार्थावर विविध पद्धधतीने प्रतिक्रिया देते, म्हणून मधुमेही रूग्णांनी सावधानतापूर्वक आहारात आंब्याचा समावेश करावा. या संदर्भात मुंबईतील मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे म्हणतात कि, “मधुमेहींनी आंबा खावा मात्र त्याचं प्रमाण सीमित असावं. मुख्य म्हणजे, मधुमेही रूग्णांना आंब्याचा आहारात समावेश करायचा असेल, तर त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यांच्या सल्ल्यानेच रुग्णांनी आंबा खावा की खाऊ नये हे ठरवावे. प्रामुख्याने मधुमेही रूग्णांनी एका दिवसाला आंब्याची एक फोड खाल्ली तर चालेल असे मानले जाते.

एकंदर काय तर, कोणत्याही मधुमेही रुग्णाला आता मन मारायची गरज नाही. मर्यादित प्रमाणात आंबा खा आणि स्वतःची काळजी घ्या. मस्त खा आणि स्वस्थ राहा.