What should be done for deep sleep?

गाढ निद्रेसाठी काय केले पाहिजे ?

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  आपल्या शरीराला जर झोप योग्य प्रकारे झाली  नाही , तर कोणतेच  काम करण्याचा उत्साह हा आपल्यालावाटत नाही.   अश्या वेळी  आपल्याला अनेक समस्यांना समोर जावे लागते.  तर सतत अस्वस्थ  वाटते. त्यावेळी आपली झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड पणा वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे गाढ झोप घेणे गरजेचे आहे. रात्रीची दहा नंतर आणि सकाळी ५ च्या पूर्वीची वेळ हि गाढ झोपेसाठी योग्य राहतो. झोप हि पूर्ण आणि  नीटनेटकी होण्यासाठी काही घरगुती उपाय …

—- आपण ज्या ठिकाणी झोपलो असेल त्या ठिकाणची जागा स्वच्छ असणे गरजेचे असते. आणि ती जागा पूर्णपणे आच्छादलेली सुंदर शय्या असलेली पाहिजे.

—- खोलीत मंद सुगंधाचा दरवळ आणि मधुर संगीत असेल तर तुमची झोप हि खूप छान होऊ शकते.

—- स्वच्छ, शांत, मोकळी आणि आरामदायी खोली असेल तर लगेच झोप लागते.

— दररोज योग्य वेळेत झोपण्याची सवय पाहिजे आणि त्याच वेळेत लवकर उठण्याची सवय असणे पण गरजेचे आहे.

— दररोज तेलाने मालिश करून स्नान केले कि झोपेच्या वेळी जास्त ताण जाणवत नाही.

— झोप पूर्ण होण्यासाठी डोळ्यांवर पाणी शिंपडले गेले पाहिजे.

— तसेच झोपेच्या अगोदर  मोबाइल हातामध्ये नसला पाहिजे.

— झोपेच्या वेळी सगळ्या लाइट बंद करून झोपल्याने लवकर आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.

—  कोणत्याही प्रकारचा   आवाज हा आपल्याला मिळणार नाही याची  काळजी घेतली पाहिजे.

—  झोपेच्या वेळा या ठरवल्या गेल्या पाहिजेत.