| | | |

कोरोनावर मात केल्यानंतर कसा असावा आहार?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याचे आपण जाणतोच. यानंतर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर हळूहळू कमी होऊ लागला आहे. दरम्यान अनेक लोक या महामारीवर यशस्वीरीत्या मात करत आहेत. यानंतर अश्या असंख्य जणांना प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा आल्याचे जाणवत आहे. त्यामुळे हा त्रास दूर करण्यासाठी आहारात पौष्टिक तत्वांचा समावेश असणे जास्त गरजेचे आहे. मात्र नेमके आहारात काय असावे याबाबत लोक अजूनही संभ्रमात आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि, कोरोनावर मात केल्यानंतर आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.

१) उपमा – उपमा हा असा पदार्थ आहे जो अनेकांच्या घरी सकाळच्या नाश्त्यासाठी बनविला जातो. मुख्य म्हणजे हा पदार्थ पचायला अत्यंत हलका आण पौष्टिक असतो. हा पदार्थ रव्यापासून केला जातो आणि रव्यामुळे छातीतील कफ पातळ होतो. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यानंतर जर तुम्हाला कफची समस्या जाणवत असेल तर उपम्यामुळे ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल.

२) सुकामेवा आणि दूध – सकाळच्या नाश्त्यामध्ये सुकामेवा व दूधाचा समावेश असावा. कारण, दुधामुळे शरीरातील ताकद वाढते. तर, सुकामेवा शरीरातील ऊर्जा संतुलित करून गरजेइतकी ऊर्जा निर्माण करतात.

३) मोड आलेली कडधान्य – आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला नेहमीच वैद्यांकडून दिला जातो. त्यामुळे फळे, भाज्या, कडधान्य खाणे शरीरासाठी पोषक असते. त्यात प्रामुख्याने कडधान्ये भिजवून मोड आलेले असतील तर ते शरीरासाठी कधीही चांगलेच असते. त्यामुळे आपल्या नाश्त्यामध्ये व जेवणामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. कारण कडधान्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्रोटीन मिळते.

४) मेथी – चवीला कडू असली तरी मोठ्या मोठ्या आजारांवर गुणकारी अशी मेथी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यास मदत करते. मेथीमध्ये कार्ब्स, प्रोटिन आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे अशक्तपणा किंवा थकवा असेल, तर आहारात मेथीचा समावेश जरूर करावा.

५) बाजरीची भाकरी – कोरोनावर मात केल्यानंतर बाजरीच्या भाकरीचे सेवन अत्यंत उपयुक्त ठरते. कारण बाजरीमुळे शरीरातील ऊर्जा वाढीस लागण्यास मदत मिळते व भूकही वाढते. शिवाय भाकरीसोबत तुम्ही लोणी किंवा दहीदेखील खाऊ शकता.

अत्यंत महत्वाचे : ही माहिती संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आणि अभ्यासावर आधारित आहे. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार अथवा आहाराचे अतिसेवन करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *