vaccine

कोरोनाचा प्रतिबंधात्मक पहिला डोस आणि दुसरा डोस यामध्ये साधारण अंतर किती असावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।भारतात सध्या कोरोनामय वातावरण झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतात सगळीकडे कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देणे सुरु झाले आहे. ज्यांचे वय ४५ पेक्षा जास्त आहे, त्या लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. तसेच १मे पासून वयाच्या १८ वर्षावरील सर्वाना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. पण केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या दोन्ही लस घेणे गरजेचे आहे. कोरोनाची पहिली लस घेतल्यानंतर साधारण किती दिवसांनी दुसरी लस घेणे आवश्यक आहे ? असे प्रश्न निर्माण झाले असतील तर त्या संदर्भांत माहिती घेऊया…..

coronavirus vaccine guidelines india

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जवळपास १३. २३ कोटी जनतेला कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. अनेक जणांनी कोरोनाची पहिली लस प्राथमिक केंद्रातून घेतली पण असेल पण दुसरा डोस पण घेणे गरजचे आहे त्यामुळे साधारण दोन्ही डोसांमधील अंतर हे ४ ते ६ आठवड्यांचे असले पाहिजे. असं ज्यावेळी लसीकरणाला सुरुवात झाली त्यावेळीच ठरवण्यात आले होते. केंद्र सरकारने सूचित केल्याप्रमाणे कोरोनाचा प्रतिबंधात्मक पहिला डोस घेतल्यानंतर कमीत कमी २८ दिवस अंतर असणे आवश्यक आहे . पण वैज्ञानिक संशोधनांनंतर काढलेल्या निष्कर्षांप्रमाणे कोव्हिशील्ड लशीच्या दोन डोसांमधील अंतर वाढवून 6 ते 8 आठवडे करण्यात आले आहे. हि कालमर्यांदा कोव्हॅक्सिनसाठी नसून फक्त कोव्हिशील्डसाठी आहे.

 

पहिला डोस दिल्यानंतर दुसऱ्या डोस साठी इतके दिवस थांबण्याची का आहे गरज ?

पहिला डोस दिल्यानंतर शरीरात दुसरा डोस लगेच दिला जात नाही. कारण शरीरात अँटीबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जाणे गरजेचे असते. ज्यावेळी पहिला डोस दिला जातो त्यानंतर हळू हळू शरीरात अँटीबॉडी तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. अँटीबॉडी पूणर्पणे तयार होण्यासाठी काही दिसावं जाणे गरजेचे आहेत. हे अँटीबॉडी शरीरात पहिला डोस दिल्यानंतरच तयार होतात.त्यामुळे प्राथमिक रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास सुरुवात होते.

साधारण नवीन नियमावलीनुसार ६ते ८ आठवड्यांमध्ये कोरोनाचा दुसरा डोस देणे आवश्यक असते, त्यालाच बूस्टर डोस म्हणतात. या डोस नंतर शरीरात आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास अधिक वेगाने सुरुवात होते. कोरोनाचा दुसरा म्हणजे बुस्टर डोस दिल्यानंतर काही प्रमाणात त्याचे दुष्परिणाम सुद्धा पाहायला मिळतात. पण त्यामुळे दिलेली लस आपल्या शरीरात काम करत आहे, हे लक्षात येते. दुसरा डोस दिल्यानंतर शरीरात फक्त अँटीबॉडीज तयार होत नाहीत. तर त्यावेळी शरीर लिंफ नोड्स म्हणजे इतर अवयवांना प्रतिक्रिया देण्यास उद्युक्त करते.

plasama therepi

जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाच्या दोन्ही डोसांमधील अंतर किती ठेवायचे यावर चर्चा सुरु आहेत. काही देशांमध्ये दोन्ही डोस मधील अंतर हे साधारण दोन ते तीन महिने इतके ठेवले गेले आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी कोव्हिशील्ड लशीच्या दोन डोसमध्ये अअंतर दीड महिन्याचं  ठेवायला सांगितलं आहे. हे अंतर साधारण कमी असावे कि जास्त असावे यावर अजूनही अनेक देशांमध्ये एकमत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण त्यावेळी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन म्हणते आहे कि, फायझरच्या या लसीच्या दोन्ही डोसांमधील अंतर हे 6 आठवड्यांचं असलं पाहिजे, 12 आठवड्यांचं नाही.