| | |

प्रोटीन मिळवण्यासाठी शाकाहार का मांसाहार?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुदृढ आरोग्यासाठी आपल्या शरीराला सर्व आवश्यक तत्त्वांची गरज असते. यामध्ये प्रोटिन्सचा देखील समावेश असतो. मुख्य म्हणजे, बॉडी बिल्डिंग व निरोगी शरीर मिळवण्यासाठी शरीरात प्रोटीनची मात्रा योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण शरीरातील प्रत्येक अवयवाला प्रोटीनची गरज असते. प्रोटीन केस, हाडे, रक्त, पेशी इत्यादींचे building blocks म्हणूनही ओळखले जाते. पण बऱ्याच लोकांना हे प्रोटीन मिळवण्यासाठी शाकाहार करायचा का मांसाहार करायचा असा एक मोठा प्रश्न पडलेला असतो. तर मित्रांनो काळजी करायचे कारण नाही. प्रोटीन मिळवण्यासाठी जे हवे ते खा. कारण शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांमधून प्रोटीन मिळवता येते. चला तर जाणून घेऊयात कोणत्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये प्रोटीन मिळते ते खालीलप्रमाणे:-

० शाकाहारी पदार्थ

१) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ – दूध, दही, पनीर आणि ताक इत्यादींचा आहारात समावेश असेल तर प्रोटीनची मात्रा संतुलित राहते. यासाठी १ कप दुधात ८ ग्रॅम प्रोटीन असते. शिवाय हे पदार्थ प्रोटीनसोबत ऊर्जा आणि कॅल्शियम देखील पुरवतात. म्हणून शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.

२) डाळ – यु एस एग्रीकल्चर डिपार्टमेंटनुसार १०० ग्रॅम डाळीमध्ये ८-९ ग्रॅम प्रोटीन असतात. मुग, मसूर, हरभरा, उडीद, तुर इ. डाळी शरीरात प्रोटीनची मात्र संतुलित करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे या डाळींचे सेवन कढी, आमटी, भाजी, सूप अश्या पद्धतीने केले जाऊ शकते.

३) सोयाबीन – प्रोटीन युक्त पदार्थांमध्ये सोया आणि सोयाबीन या पदार्थांचा प्रामुख्या ने समावेश होतो. साधारण १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये ४० ग्रॅम प्रोटीन असते. यासाठी आपल्या आहारात सोयाबीन सोबत सोया मिल्क आणि टोफूचादेखील समावेश लाभदायक ठरते. परंतु, सोयाबीनमध्ये phytoestrogenचे प्रमाण अधिक असल्यामुळे हार्मोनल समस्या वाढतात. त्यामुळे नियमितपणे सोयाबीन खाणे टाळावे.

४) काळे चणे – काळे चणे आणि गूळ हे नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर आहे ज्यात प्रोटीनची मात्रा मोठी असते. शिवाय कारण काळ्या चण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा परिणामी वजन नियंत्रणात राहते.

० मांसाहारी पदार्थ

१) अंडी – अंडी प्रोटीनचा मोठा स्रोत मानला जातो. कारण यामध्ये विटामिन ए, विटामिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फोलेट, कोलीन इत्यादी घटक देखील मोठ्या प्रमाणात असतात. हे सर्व घटक शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे अंड्यापासून तयार होणारे कोणतेही पदार्थ वा नुसते उकडलेले अंडे देखील खाल्ल्याने शरीराला फायदा होतो.

२) मासे – माश्यांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. शिवाय मासे डीएचए’चे उत्तम स्त्रोत आहेत. जे डोळे, मेंदू आणि शरीराच्या विकासासाठी लाभदायक असते. माशांमध्ये अँटी -ऑक्सीडेन्ट, अँटी इंफ्लेमेटरी, न्युरोट्रोफीक गुणधर्मदेखील आढळतात. यामुळे माश्याचे कोणतेही पदार्थ शरीरासाठी लाभदायकच ठरतात.

३) चिकन व मटण – चिकनमध्ये आणि मटणमध्ये उच्च प्रोटीन आढळते. युएस डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरच्या रिपोर्टनुसार १०० ग्रॅम चिकनमध्ये २७ ग्रॅम प्रोटीन व कार्बोहायड्रेट आढळतात. शिवाय चिकनसह मटणमध्ये विटामिन बी, कॅल्शियम, जस्त (zinc), सेलेनियम, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड इत्यादींचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला विशेष लाभ मिळतात.