What to do if a bee stings?

मधमाशांनी डंख मारल्यास काय करावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । गावाकडे मोठ्या प्रमाणात मधमाशा आणि मव्हाचे पोळे असतात . मध काढताना मधमाशापासून सावध राहून मध काढावा लागतो. रानातील नैसर्गिक रित्या तयार असलेला मध हा आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे . त्याच्यामध्ये कोणत्याही रासायनिक घटकांचा समावेश नसल्यामुळे त्याचा वापर हा लहान बाळांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी केला जातो. अनेक वेळा मध काढताना मधमाशा  यांचा डंख  लागू शकतो. त्यावेळी मात्र ज्या ठिकाणी डंख  लागला आहे . त्या ठिकाणी डोळ्यांची आग आग हि जास्त प्रमाणात होत असते . आगी मव्हाचे पोळे असेल तर मात्र त्या माश्या खूप जोरात चावतात . आणि त्यामुळे जास्त त्रास हा होतो. अशा वेळी घरगुती कोणत्या उपायांचा वापर हा केला गेला पाहिजे हे जाणून घेऊया ….

शहरी असो किंवा ग्रामीण भागात मधाचे पोळे आढळतेच . पण अशा वेळी डंख  मारला असल्यास प्रथम ज्या ठिकाणी डंख  मारला आहे . त्या भागात काटा आहे का ? ते मात्र पाहून घ्या . असेल तर तो काटा पटकन काढण्याचा प्रयत्न करा . त्यामुळे सूज जास्त वाढणार नाही. आणि मधमाश्या याचे विष हे मात्र जास्त पसरले जाणार नाही . लगेच डंख  लागल्या लागल्या त्या भागात मध लावण्याचा प्रयत्न करा . त्यामुळे सुजेचे प्रमाण हे जास्त राहणार नाही. तसेच जास्त दुखत असेल तर मात्र त्यावर बर्फ लावला जावा. त्यामुळे थंड पडून त्याची आगा आग हि होणार नाही .

अनेक वेळा मधमाशा या ज्या व्यक्तीने मध काढला आहे. त्याचा पाठलाग करतात . अशा वेळी मधमाशापासून दूर राहायचे असेल तर त्यावेळी अंगावर जाड कापड घेऊन पाण्याचा फवारा हा जास्त करावा . म्हणजे मधमाशा या पाठलाग सोडून दूर जाऊ शकतील. ज्या ठिकाणी लाल झाले असेल तर त्या ठिकाणी कोरफड याचा गर वापरून ते थंड करा. तसेच खाण्याचा सोडा जरी हातावर लावला तर त्याच्यामध्ये अल्काईन चे प्रमाण हे जास्त असते . अशा वेळी त्याचे विष हे जास्त पसरले जाणार नाही . बेकिंग सोडा यामुळे त्याची सूज आणि दाह सुद्धा कमी कमी होत जातो.