कोरोनाचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास काय करावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक लोक दगावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून  संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोनाची लस  दिली जात आहे.  अनेक ठिकाणी त्याचे काम पूर्णतः झाले पण आहे. कोरोनाची लस घेतल्याने मृत्यूचा धोका फ़ार कमी  प्रमाणात आहे. त्यामुळे सगळ्यांनी कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हंटले आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनाची पहिली लस घेतली असेल आणि दुसरी लस घेण्यास उशीर झाला तर दुसऱ्या वेळेस लोकांनी कोरोनाच्या लसींऐवजी  किंवा कोव्हिशील्ड ऐवजी कोव्हॅक्सीन घेतली तर चालेल का?  कारण काही दिवसांपासून कोरोनाची लस खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे.  आणि जर दुसरा डोस मिळाला नाही तर त्याचा आरोग्यावर काही विपरीत  परिणाम  होतो का ? अशा वेळी दोन्ही वेगवेगळ्या  कंपनीच्या लसी घेण्याऐवजी एकाच कंपनीची लस घ्यावी का ? असे अनेक प्रश्न उपस्थित  करण्यात येत आहेत.

plasama therepi

—  जरी कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर  दुसऱ्या डोसच उपलब्ध  झाला नाही. तर कोणत्याही व्यक्तीवर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही.  दुसरा डोस  जरी नाही मिळाला तरी काही दिवसांनी घेणे गरजेचे आहे.

—  जर लसीचा दुसरा डोस मिळालाच नाही किंवा घेतला नाही तर शरीरावर जास्त प्रमाणात परिणाम होणार नाहीत.  परंतु कोरोनाच्या विरोधात  लढण्यासाठी  पुरेशा अँटीबॉडीज शरीरात तयार होणं गरजेचं आहे. जर दुसरी लस घेतली नाही तर, शरीरात पुरेशा अँटीबॉडीज तयार होणार नाहीत. त्यामुळे विषाणूशी लढण्यासाठी शरीरात लसींचा जेवढा प्रभाव हवा तेवढा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे  तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार   दुसरा डोस घेणे गरजेचं आहे.  त्यामुळे आपल्याला ७१ टक्के सुरक्षितता  निर्माण होते.

coronavirus vaccine guidelines india

—  लसीचा दुसरा डोस मिळत नसल्यास कुठे तक्रार करावी?

जर नागरीकांना लसीचा दुसरा डोस मिळत नसेल तर त्यांनी संबंधित लसीकरण केंद्राला या बद्दल माहिती द्यावी. तुम्ही पहिली लस ज्याठिकाणी घेतली आहे, त्याच ठिकाणी तुम्हाला दुसरी लस मिळणे अपेक्षित आहे. तेव्हा त्याच केंद्रात जाऊन तुम्ही लसीची चौकशी करावी.  ज्याठिकाणी तुम्ही नोंद केली आहे . त्या लिंक वर जाऊन  तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

— पहिला डोस एका लसीचा घेतला, आणि दुसऱ्या डोस दरम्यान ती लस उपलब्ध नसेल, त्याजागी दुसरी लस उपलब्ध असेल, तर दुसरा डोस वेगळ्या लसीचा घ्यावा  का ? असा प्रश्न असेल तर मात्र उत्तर नाही आहे. कारण तुम्हीच पहिला  डोस हा एका कंपनीचा घेणार आणि दुसरा डोस हा दुसऱ्या कंपनीचा  घेणार तर ते चुकीचे आहे.   असे मत  आरोग्य विभागाचे सर्वेक्षण  अधिकारी  डॉ प्रदीप  आवटे यांनी म्हंटल आहे. त्यामुळे  नागरिकांनी अजिबात गहाळ राहू नये.  त्यामुळे  नागरिकांनी  काळजी घ्यावी.