If you suffer from nasal congestion in winter ....

घशात खवखव आणि सारखे खकरावे वाटते तर काय करावे?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आजूबाजूचे वातावरण  हे जर खराब असेल तर त्यावेळी  मात्र   घसा , नाक  डोकेदुखी यासारख्या समस्या या  निर्माण होतात .  त्यावेळी   टॅबलेट घेण्यापेक्षा घरगुती उपायांचा वापर हा जास्त प्रमाणात केला जावा .  आजीबाईंच्या  बटव्यातील काही पदार्थाचा किंवा वस्तूंचा वापर   आपल्या घशाला करू शकतो. साधारणपणे  सर्दी ,  ताप , खोकला अशी जी काही  लक्षणे आहेत ती म्हणजे जवळपास कोरोनाची लक्षणे आहेत . अश्या वेळी घाबरून   जाऊ नये , कारण वर्षांतून एकदा तरी अशा लक्षणांचा सामना  हा  करावा लागतो.

शरीरात जर पित्ताचे प्रमाण हे जास्त असेल तर   घसा हा खरखर करत असतो.  तसेच आम्ल्पित  हे जर जास्त असेल तर  मात्र त्यावेळी डोकेदुखी हि वाढत असते .   घश्यात जर जास्त प्रमाणात खवखव होत असेल तर त्यावेळी  वायरल इन्फेकशन हे त्याचे  महत्वाचे कारण आहे .  टॉन्सिल ,  तसेच  नियमित  अल्कोहोलिक पदार्थांचे सेवन  हे त्याचे प्रमुख कारण आहे .  तसेच कोणत्या ना कोणत्या  प्रकारच्या गोळ्या या आहारात असतील तर त्यावेळी सुद्धा अशा समस्या या निर्माण होऊ शकतात.

त्यासाठी उपाय म्हणून लसणाची एखादी पाकळी हि  दोन्ही दातांच्या मध्ये  टाकून  ते चॉकलेट प्रमाणे  चघळावे म्हणजे  त्याचा सारा रस हा आपल्या पोटात जाऊ शकतो.    जास्तीत  जास्त  प्रमाणात गरम पदार्थांचा वापर हा  करावा . म्हणजे मध   त्याचा काढा ,  तुळस आणि लवंग टाकून तयार केलेला काढा किंवा गरम असलेले सूप यामुळे सुद्धा तुमच्या घश्याला  आराम मिळू शकतो.  अद्रक  याचे द्रव्य सुद्धा  आपल्या शरीराला जास्त फायदेशीर आहे .  अनेक वेळा पोटातील ऍसिडिटी हि आपल्या गळ्यापर्यंत येते त्यावेळी मात्र   घसा हा  खवखव करत असतो.   त्यामुळे जास्त  पित्त होत असतील असे पदार्थ आहारात    ठेवू  नये .