kestod

शरीरावर केसतोड झाल्यास काय करावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या शरीरावर केसतोड झाली असेल तर त्यावेळी मात्र आपल्याला त्या ठिकाणी खूप खाज यायला सुरुवात होते . ज्यावेळी आपल्या शरीरावरील एखादा केस हा मुळासकट उपटून  निघतो. त्यावेळी छोटा पिंपल्स हा  भागावर   येतो. आणि त्याठिकाणी खाज यायला सुरुवात होते . यालाच केसतोड असे म्हणतात.   केसतोड झाले असल्यास कोणते  घरगुती  उपाय करू शकता ते जाणून घेऊया ….

ज्या ठिकाणी केस तोड झाला आहे . त्यावेळी ती जागा थंड पडण्यासाठी त्याठिकाणी कोरफडचा रस  किंवा कोरफड चा  गर लावला जावा.  त्याने  त्या ठिकाणी आग- आग होणार नाही . सकाळी उठल्या उठल्या कोरफड यांचा गर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तसेच कडुलिंब हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे . कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून त्याचा वापर हा ज्या ठिकाणी पुरळ आले आहे त्या ठिकाणी करा. कडुलिंब हे   खाज  कमी होण्यासाठी आणि  झालेली जखम लवकर भरून काढण्यासाठी    वापरले जाते .  हळद हि खूप आयुर्वेदीक आहे . तिचा  अँटीबॅक्टरील म्हणून  वापर हा केला जातो. त्याने जखम लवकर सुकून जाते .आणि त्यातून पाणी निघण्याच्या समस्या या दूर होतात.

आहारात  लसूण  हा  वापरला जातो.  लसणाच्या   पेस्ट च्या  मदतीने आयुर्वेदीक उपचार  करू शकतो.  लसणाचा वापर  केल्याने  फोड हा फुटतो. आणि एका जागीच बसतो. लसणाच्या काही पाकळ्या या बारीक करून त्याचा रस घ्या , आणि त्याचा वापर हा त्या जागेवर करू शकता. सूज आली असेल तर त्याठिकाणी कोमट पाण्यात सुती रुमाल वापरून त्याचा वापर हा त्या फोडीवर करू शकता.