| | |

तिखट भाजीमुळे जीभ झाली लाल; लगेच जाणून घ्या काय करालं?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेकदा घाई आणि गडबड या नादात कधी भाजीत मीठच जास्त पडतं तर कधी तेल. पण ज्या दिवशी भाजीमध्ये तिखट जास्त पडतं त्यादिवशी जिभेचे नुसते हाल होतात. हायहुई करण्यात भूक मरते आणि डब्यातली भाजी तशीच उरते. एकदा का जिभेला मिरची लागली का.. बस्स. किमान तासभर तरी पाणी आणि गोड खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. त्यात हा जाळ इतका त्रासदायक असतो कि अगदी पोटापर्यंत या तिखटाची झळ बसते. म्हणूनच भाजीत जर तिखट जास्त पडलंच तर वेळीच यात सुधारणा करा. आता ते कसं? जर भाजी जास्त तिखट बनली असेल तर काय करायचे? यासाठी आम्ही तुम्हाला एकही सोप्प्या टिप्स सांगणार आहोत त्या जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) भाजी किंवा डाळीत चुकून जर जास्त मिरची पडली असेल तर पदार्थाची चव निश्चितच बिघडते. यासाठी एकदम सोप्पा उपाय म्हणजे भाजीवर आलेला मसाल्याचा तवंग काढून टाका आणि यात पाणी मिसळून उकळी काढा. असे केल्यास भाजीचा तिखटपणा कमी होतो.

२) एखादा पदार्थ प्रमाणापेक्षा तिखट झाल्यात यात तूप वा लोणी घाला. याचा परिणाम म्हणजे तिखटपणा कमी होईल.

३) भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी भाजीमध्ये दही, ताक किंवा ताजी मलई घालू शकता.

४) तिखट झालेली भाजी जर का तरळ भाजी असेल, तर या भाजीमध्ये टोमॅटो प्युरी मिसळून भाजी वाढवा. पण याआधी थोडे तेल घालून प्युरी वेगळ्याने परतून घ्या. अन्यथा भाजी खराब होण्याची शक्यता असते.

५) उकडलेले बटाटे कुस्करून भाजीत मिसळल्यास भाजीचा तिखटपणा कमी करता येतो.

६) जर का भाजी कोरडी असेल आणि तिखट झालीच तर यात थोडे बेसन भाजून मिसळा.

७) भाजीमध्ये नारळाचे तेल किंवा किसलेला ओला नारळ टाकल्याने तिखटपणा कमी होतो.

८) पनीर करी / कोफ्ता वगैरे भरपूर करी असलेली भाजी तिखट झाल्यास यात थोडी साखर घाला आणि बिघडलेली चव पुन्हा मिळवा.

९) जर ग्रेव्ही असलेली भाजी खूप मसालेदार असेल तर थोडे दूध, किसलेला मावा (खवा), काजू पेस्ट, फ्रेश क्रीम इ. पदार्थ घालून चव संतुलित करता येते. एकदा भाजीची चव चाखून आवश्यक असल्यास थोडे मीठ आणि आंबट घाला. यामुळेही भाजीचा तिखटपणा कमी होतो.

१०) जर बटाटा भाजी असेल आणि भाजी घट्ट असेल तर यात उकळलेलं पाणी घाला. पाणी घातल्यानंतर ते उकळी येईपर्यंत थांबा आणि नंतर चव घेऊन मीठ तपासा.