What to do if you always get up in the morning and suffer from cold

नेहमी सकाळी उठल्या उठल्या सर्दीचा त्रास होतो, तर काय करावे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा असे होते कि , हिवाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या दिवसांत सर्दीचा त्रास हा सगळ्यांनाच होत असतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यत सगळ्या जणांना सर्दीचा त्रास हा काही प्रमाणात जाणवू शकतो. सर्दी हि काही काळासाठी असते. त्यानंतर मात्र ती आपोआप निघून जाते , तर कधी कधी डॉक्टरांच्या सल्याने त्याच्या समस्या या कमी कमी होत जातात. पण उन्हाळा असो , किंवा पावसाळा आणि थंडी असो, अश्या सगळ्या ऋतूंमध्ये जर तुम्हाला सर्दीचा त्रास जाणवत असेल तर ….

अनेकांना सकाळी उठल्या उठल्या सर्दी होते , त्यानंतर दिवसभराच्या कामकाजात सर्दी हि पूर्णतः गायब असते. सर्दीचा जो काही त्रास आहे तो फक्त सकाळच्या वेळेत जास्त जाणवतो. तर त्याची कारणे हि वेगवेगळी आहेत, अनेकांना सायनचा त्रास असतो . त्यामुळे हि सर्दी त्यांची पाठ सोडत नाही. अश्या वेळी घरगुती उपायांचा वापर करणे जास्त आवश्यक आहे. अनेक वेळा डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त गरजेचे आहे. पंचकर्म हा सुद्धा त्याच्यावर जालीम उपाय आहे. घरगुती सुंठ वापरली तरी सर्दी काही दिवसांत कमी होऊ शकते.

सकाळी सहन होईल इतके गरम पाणी अर्धा लिटर त्यात मीठ टाकून एका नाकपुडीतून तोटी असलेल्या भांड्याचे सहायाने एका नाकपुडीतून ओढणे याला जलनीती म्हणतात.पाणी किंचित ओढल्यास ते व श्वास तोंडाने घेट रहा पाणी दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर पडेल. साधारण अशीच क्रिया जर दुसऱ्या नाकपुडीसाठी जरी केले तर त्याचा फायदा हा आपल्या होतो. काही दिवसांत सर्दीचा त्रास हा पूर्णतः कमी होण्यास मदत होऊ शकते. सर्दीचा त्रास होणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे इफेक्ट हे आपल्या ला होणार नाहीत.