What to do if you have a habit of blabbering on in your sleep?

झोपेत बडबड करण्याची सवय असल्यास काय करावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  अनेकांना रात्रीची बडबड करण्याची सवय जास्त असते. बडबड करताना इतरांची झोप मोडते याचे मात्र भानच उरत नाही. आपल्या आजूबाजूला असे अनेक नमुने असतात, कि ते रात्रीचे बडबड करत असतात आणि इतरांची झोप हि मोड करत असतात. आपल्या आजूबाजूला असे कोणी झोपलेले आढळले कि ,आपल्याला खूप त्रास हा होतो. त्याच्यापासून दूर झोपावे किंवा त्याला आपल्यापासून दूर  करावे असे वाटत असते. पण सर्वात महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी बडबड केली जाऊ नये , म्हणून काय उपाय करता येऊ शकतात. याची माहिती घेऊया…

जी लोक झोपेत जास्त बडबड करतात त्यांना पॅरासोमिया असे म्हंटले जाते. ह्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आढळते.रात्री झोपताना मेंदूत डेल्टा व्हेन ची स्थिती असते. दोन प्रकारची स्वप्न आपल्याला येत असतात.सायकॉलॉजिकल स्वप्न म्हणजे रडण्याचे स्वप्न ,कोणाची मृत्यू या प्रकारची भावनांशी जुडलेले असते भौतिक स्वप्न म्हणजे यात आपण स्वप्नात चालतो फिरतो,खेळतो ,काहीतरी क्रिया करत असतो. ज्या दिवशी स्वप्न आणि वास्तविकाची बॅलन्सड बिघडतो तेव्हा झोपेत चालणे,बोलणे,कोणाला मारणे ह्या गोष्टी घडतात.हे कधीतरी होत असेल तर ठीक आहे.हे जर रोज होत असेल तर तुम्ही स्वतःची दिनचर्या तपासली पाहिजे . त्यामुळे कधी कधी ते फ़ार धोकादायक असते.

ते टाळण्यासाठी काय करावे ?

— झोपण्या अगोदर तुम्ही यासाठी ध्यानाचा उपयोग घेऊ शकता.छान असे शांत संगीत ऐकू शकता.

— जेवणानंतर रात्री बाहेर पायी फिरायाला जा.

— झोपण्याअगोदर अर्धा ते १  तास आधी मोबाईल किंवा टीव्ही पाहू नका.

— झोपण्या अगोदर तुम्ही पुस्तक वाचू शकता.

— रात्री जेवण कमी करा.

— रात्री तोंड धुवून फ्रेश होऊन झोपा.

— झोपण्यापूर्वी थोड्या प्रमाणात पाणी प्या.