eyes

डोळ्यांना इजा झाल्यास काय करावे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आरोग्याबरोबर आपल्या डोळ्यांची  काळजी घेणे आवश्यक आहे. डोळे जर व्यवस्थित नसतील तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जायला लागू शकते. आपण आजूबाजूचे जग हे डोळ्यांच्या मदतीनेच पाहू शकतो. जर डोळ्यांना थोडा जरी आजार झाला आणि आपण दुर्लक्ष केले तर दृष्टी कमी होऊन एक दिवस काहीच आजूबाजूचे दिसत नाही. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असते. डोळे हे नेहमी स्वच्छ राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे .

अनेक वेळा आपल्या डोळ्यांना छोटीशी जखम झाली तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि घरगुती पद्धतीने आपण त्यावर इलाज करण्याचा प्रयत्न करत असतो. पण जर जखम हि मोठ्या स्वरूपातील असेल तर त्यावेळी मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कधी कधी डोळे लाल होतात हि जरी सामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये.

— तुमच्या डोळ्यात रंग गेला तर सामान्य तापमानाला असलेल्या पाण्याने डोळे धुवा. किंवा एका बशीमध्ये काही प्रमाणात थंड पाणी घेऊन बशी हि डोळ्यांपर्यंत घेऊन जा . जो कोणता पदार्थ डोळ्यात गेला असेल तर तो निघून जाण्यास मदत होते .

— डोळे लालसर होणे, वेदना होणे, जळजळ होणे किंवा प्रकाशाकडे पाहण्यास त्रास होणे, अशी लक्षणे दिसत असतील तर त्यावेळी आपल्या डोळ्यांना सतत खाजवू नका. नेत्रविकार तज्ज्ञाची भेट घ्या.

— डोळ्यांना खाज सुटत असेल तर त्यावेळी सुद्धा डोळे अजिबात खाजवू नका .

— डोळ्याला पाण्याचा फुगा लागला तर स्वच्छ कापडाने डोळा झाका.

— जर साधे कस्पट डोळ्यात गेले असेल तर एखादी फुंकर मारून डोळे साफ करा .

— गरम कापड तयार करून त्या कपड्याच्या मदतीने डोळे शेका.

— डोळ्यांसाठी कोणत्याही गोष्टी वापरू नका. डॉक्टरांच्या सल्यानुसार डोळ्यात कोणतेही औषध टाका .