| |

जेवणानंतर रक्तातील साखर वाढू नये म्हणून काय कराल?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल बदलती जीवनशैली अनेको आजारांना निमंत्रण देत आहे. आजकल अनेको लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त झाल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम. मधुमेहामुळे आरोग्यविषयक बऱ्याच गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी खाण्यापिण्याच्या पद्धतींवर विशेष लक्ष द्यायला हवे. कारण मधुमेहाचे प्रमाण वाढल्यास हृदय विकार, त्वचेच्या समस्या, पायांना त्रास होणे अशा समस्या उदभवतात. त्यामुळे मधुमेहाने ट्रस्ट असलेली व्यक्ती कोणता आहार घेते किंवा नियमित कोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन करते यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण आपल्या दिनचर्येत आपण जे पदार्थ खातो त्यांवर रक्तातील साखरेचं प्रमाण अवलंबून असतं. त्यामुळे खाण्यामध्ये काही बदल झाला तर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी-जास्त होतं.

अनेकदा आपण पहिले असेल कि जेवणानंतर मधुमेहींच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत. पण असं का होत आणि आणि असं होत असेल तर त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे? हे आपल्याला ठाऊक नसते. म्हणून हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण का वाढते ते जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

० जेवणानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण का वाढतं?
– रक्तातील साखरेचं प्रमाण सतत वाढणं या स्थितीला पोस्टप्रांडियल किंवा हायपरग्लायसेमिया असं म्हणतात. अशा प्रकारची स्थिती आहाराचे प्रमाण, जेवणाची वेळ, औषधांची वेळ, आपण सेवन करत असलेल्या खाद्यपदार्थांमुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर होणार प्रभाव यांमुळे हि स्थिती उदभवते. चला तर जाणून घेऊयात रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित कसं करता येईल. खालीलप्रमाणे:-

१) ​‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन
– मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आहारात काय खावे आणि किती खावे हेही जाणून घेणे आवश्यक आहे. ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असणाऱ्या खाद्य पदार्थांचे सेवन करणे मधुमेहींसाठी उपयुक्त ठरते. तसेच ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम जाणवण्यास सुरुवात होते. म्हणूनच कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन कधीही शरीरासाठी उत्तमच.

२) ​आहाराकडे विशेष लक्ष
– मधुमेहींनी एक डाएट चार्ट तयार करावा आणि त्यानुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी ठेवाव्यात. यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कोणत्या खाद्यपदार्थांचे सेवन करता याकडे विशेष लक्ष द्यावे. मुख्य म्हणजे मिठाई, पांढऱ्या रंगाचा ब्रेड तसेच अन्य खाद्य पदार्थांचे सेवन पूर्णपणे वेळीच टाळावे. कारण या खाद्यपदार्थांचे सेवन जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरते.

३) ठराविक आणि थोड्या प्रमाणात आहार घ्या
– एकाचवेळी अधिक जेवण करणे टाळा. याऐवजी थोड्या थोड्या वेळाने पौष्टिक खाद्य पदार्थ खा. यामुळे शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो आणि याचसोबत मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. याशिवाय थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणात सतत होणारे बदल यामध्ये स्थिरता येते. यासाठी दिवसातून तीन वेळा अधिक जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने पोषक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते.

४) ​हेल्दी कार्बोहायड्रेटचं सेवन फायदेशीर
– रक्तातील साखरेच्या प्रमाणावर कार्बोहायड्रेटचा प्रभाव जाणवतो. याकरिता मधुमेह असलेल्या लोकांनी कमी कार्बोहायड्रेट आणि हेल्दी कार्ब्सचे सेवन करणे आवश्यक आहे. तसेच अधिक कार्ब्सचे सेवन करण्यापासून अधुमेहींनी अंतर ठेवावे. याशिवाय तुम्ही नियमित किती कार्ब्सचे सेवन करता याकडे लक्ष दिल्यास रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येते.

५) नियमितपणे व्यायाम करणे
– आहारामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो हे कितीही मान्य असले तरीही डाएट करण्यासोबत शरीराला हालचालींची आवश्यकता असते. यासाठी मधुमेहींनी न चुकता दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण नियमित व्यायाम केल्यामुळेसुद्धा रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तसेच सुरुवातीलाच हेवी वर्कआउट न करता हळूहळू व्यायाम करण्याची गती वाढवा. म्हणजे शारीरिक ताण देखील दूर राहील.