What to do when your lips turn black?

ज्यावेळी तुमचे ओठ काळे पडतात , त्यावेळी कोणत्या प्रकारचे उपाय करावेत ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । महिला या कोणत्याही कार्यक्रमाला जाताना नेहमी छान तयार होऊन जातात. त्या तयार होताना आपले ओठ हे सुदंर दिसावेत यासाठी  वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिक चा वापर करतात . पण सतत नवनवीन केमिकल युक्त लिपस्टिक जर वापरली तर मात्र त्यापासून जास्त त्रास होऊन ओठ काळे पडतात. त्याचा परिणाम हा आपल्या सौदर्यावर होत असतो. अशा वेळी कोणत्या घरगुती उपायांचा वापर हा केला जावा ते पाहूया ….

जर तुम्ही जास्त वेळ उन्हात असाल तर त्यावेळी सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचा काळपट पडते. तसेच आपले ओठ सुद्धा काळे पडण्यास सुरुवात होते. अनेक वेळा अगदी कमी प्रतीची लिपस्टिक ज्यावेळी आपल्या ओठांना लावत असाल तर त्यावेळी सुद्धा तुमचे ओठ हे काळे पडतात . त्यासाठी दररोज रात्री झोपताना काही प्रमाणात ग्लिसरीन हे आपल्या हातावर घ्या . आणि ते ग्लिसरीन हे आपल्या तोंडावर आणि ओठांवर लावा. काही दिवस हा प्रयोग केला असता तुमचे ओठ काळे होण्यापासून दूर होतात. तसेच मुलायम होण्यास मदत होते . आपल्या घरात असलेले एखादे बिट कापून त्याचा वापर हा आपल्या ओठांसाठी केला जाऊ शकतो. आठवड्यातून तीन वेळा फ्रिज मध्ये जे बिट आहे कापून घ्या , आणि ते आपल्या ओठांवर कमीतकमी २० मिनिटे घासा. त्याने ओठ लाल तर होतातच तसेच काळपट पणा हा खूप कमी कमी होत जातो.

काकडीचा रस सुद्धा ओठांना जास्त लाभकारी आहे . काकडीचा रस तयार करून तो रस काही वेळ फ्रिजमध्ये ठेवावा. कापसाच्या मदतीने तो रस आपल्या ओठांवर लावला जावा. त्यामुळे काकडीच्या मदतीने आपले ओठ हे मुलायम होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आहारात काकडी असली पाहिजे .