Tuesday, January 3, 2023

कोणत्या प्रकारचे पदार्थ खाल्याने रक्ताच्या गाठी तयार होऊ शकत नाहीत ?

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या दररोज च्या जीवनात रक्ताभिसरण हे फार गरजेचे आहे. रक्ताभिसरण जर योग्य पद्धतीने नाही झालं तर मात्र आपल्याला अनेक प्रकारचा त्रास हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रक्ताभिसरण च्या बाबतीत खूप काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरावर जर जखम झाली तर त्यावेळी काही वेळाने सारे रक्त हे गोठले जाते. अश्या वेळी रक्त सारे सुकून जाते. त्यामुळे रक्त जास्त वाया जात नाही.

व्हिटमिन के हे आपल्या शरीरातील रक्तासाठी फायदेशीर असतं. कारण हे व्हिटॅमिन शरीरातील रक्त घट्ट होऊ देत नाही. त्यामुळे आपला ब्लड फ्लो योग्य राहतो आणि शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत नाही. म्हणजेच तुम्हाला ब्लड क्लॉटिंगचा धोकाही राहत नाही. त्यामुळे चला जाणून घेऊन व्हिटमिन – के कसं मिळवता येईल आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत.

हाडांसाठीही फायदेशीर व्हिटॅमिन के —

व्हिटॅमिन के हे फक्त रक्तासाठीचा फायदेशीर असे नाही , तर त्याचा वापर हा आपल्या हाडांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. याने हाडांचं मेकॅनिजम ठिक होतं. त्यामुळे हाडे सॉफ्ट होत नाही आणि कमजोरही होत नाहीत. अशात फ्रॅक्चरचा धोका कमी राहतो. शरीरात व्हिटॅमिन के ची कमतरता सामान्य बाब नाही. याची खासियत म्हणजे फार रेअर केसमध्ये या व्हिटॅमिनची शरीरात कमतरता होते, पण जेव्हा होते तेव्हा हे कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराचं कारण ठरतं. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे रक्ताच्या गाठी तयार होणं वाढतं. याने जीवाला धोका होऊ शकतो. तसेच रक्त पातळ होऊ लागतं. अशात जखम झाली किंवा ब्रेन हॅमरेज झाल्यावर रक्त अधिक वाहू लागतं. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि फळे हि खाल्ली गेली पाहिजेत.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...