vaccine

कोरोनाची लस घेतल्याने कोणत्या प्रकारच्या समस्या जाणवतात ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । गेल्या  वर्षीच्या सप्टेंबर मध्ये आलेल्या कोरोनाच्या  आजारापासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक लस घेतली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी  प्रयत्न सुरु आहेत. भारताकडे कोरोनापासून वाचण्यासाठी लस उपलब्ध  झाली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढला आहे.  ठिकठिकाणी ऑक्सिजन बेडची संख्या कमी आहे आणि रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहेत. ऑक्सिजन चे प्रमाण कमी असल्याने अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे भारतीय सरकारने कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्याचे काम सुरु केले आहे.

अमेरिका, ब्रिटेनसारख्या देशांमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जवळपास दोन लाख नागरिकांनी  नावनोंदणीही केली आहे. भारतातील खेड्यांमध्ये सुद्धा लस देण्याचे काम सुरु आहे. मात्र, या लसींमुळे शरीरावर अनेक साईड ईफेक्ट होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे लोक लस घेण्यास घाबरत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स तसेच आरोग्य विषयक तज्ज्ञांकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. ज्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी आहे . त्या लोकांनी तर प्रथम लस घेणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी वय वर्ष ४५ च्या पुढील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. १ मे पासून १८ वर्षावरील लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहेत. कोरोनाला थोपवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत.

भारतात दिल्या जात असणाऱ्या कोरोना लसीचे काही साईट इफेक्ट पाहायला मिळत आहेत. अनेक कंपन्यांनी तयार केलेल्या लसीची चाचणी काही स्वयंसेवकांवर करण्यात आली.त्यावेळी सुद्धा काही साईट इफेक्ट जाणवले होते.पण ते नगण्य स्वरूपाचे आहेत. काही व्यक्तींना कोरोनाची लस घेतल्यानंतर त्रास जाणवत असेल , तर तो त्रास कशा स्वरूपाचा आहे. आणि त्याचे शरीरावर होणारे इफेक्ट कोणते आहेत, ते जाणून घेऊया ………

cold

ताप आणि थंडी—

कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात नवीन अँटी बॉडीज तयार होत असतात. जुन्या अँटीबॉडीज सोबत जुळवून घेण्यासाठी काही प्रमाणात त्रास हा सहन करावा लागतो. अनेक लोकांच्या अनुभवानुसार लस घेतल्यानंतर काही वेळात शरीरात थंडी जाणवू लागते. त्यामुळे शरीरात ताप येतो. कधी कधी हा ताप  जास्त  वाढू शकतो.  १०२ डिग्री सेल्सिअसपर्यंत भरला जाण्याची शक्यता असते. पण घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.

If headaches are increasing due to more stress ....

डोकेदुखी—-

कोरोनाची लस घेतल्यानतंर काही प्रमाणात डोकेदुखीचा त्रास जाणवतो. मानसिक ताण तणाव आणि चिडचिडेपणा अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे अनेक वेळा सर्वसामन्य लोकांना लस घेतल्यानतंर मनाची तयारी करून ठेवा , कि आपल्याला अशा स्वरुपाचे आजार होऊ शकतात.

उल्टी आणि मळमळ—

कोरोन लस घेतल्यानंतर शरीरातील ग्रॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकवर परिणाम पडू शकतो. परिणामी लस घेतल्यानंतर उल्टी आणि मळमळ अशा स्वरुपात साईड ईफेक्ट जाणवू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार मॉडर्ना लसीची सर्वाधिक मात्रा देण्यासाठी एका स्वयंसेवकाची निवड करण्यात आली होती. या स्वयंसेवकाला ही मात्रा दिल्यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्याला उल्टी, मळमळ, घबराट अशी लक्षणं दिसली होती. कोरोनाची लस घेतल्यानंतर अशा स्वरूपाच्या समस्या कदाचित निर्माण होऊ शकतात.

Could leg pain be a heart attack?

स्नायूदुखी– 

ज्या ठिकाणी कोरोना लस टोचलेली आहे; त्या ठिकाणी स्नायूमध्ये वेदना जाणवू शकतात. तसेच, लस टोचलेला भाग लाल होणे किंवा वृण उमटण्यासाखे साईड ईफेक्ट होऊ शकतात. मॉर्डना, फायझर  यांनी विकसित केलेल्या लसी टोचल्यानंतर अशा प्रकारच्या समस्या दिसून आलेल्या आहेत.

maygran

मायग्रेन

लस घेतल्यानंर मायग्रेन म्हणजेच एका बाजूने डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. एका अहवालानुसार फायझर लस घेणाऱ्या एका स्वयंसेविकेला मायग्रेनची समस्या जाणवली होती. हा त्रास अतिशय तीव्र स्वरुपाचा होता.