|

सुकामेवा जास्त टिकण्यासाठी काय कराल?; जाणून घ्या फायदेशीर टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुकामेवा आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतो हे आपण सारेच जाणतो. पण सुकामेवा सारेच खात नाहीत आणि याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या किमती सर्वांना सोयीस्कर नसतात. त्यामुळे सुकामेवा घाऊक खरेदी करणं फायद्याचं ठरतं. परंतु यामुळे अनेकदा हवामानातील बदलाच्या प्रभावाने तो लवकर खराब होतो. जसे कि, सुकामेवा बराच काळ तसाच राहीला तर त्याला किड लागते आणि ते खाण्यायोग्य राहत नाहीत. यासाठीच योग्य पद्धतीने सुकामेवा साठवणे गरजेचे आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही अगदी सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने तुम्ही अगदी सहज सुका मेवा जास्तीत जास्त दिवस साठवून ठेवू शकता. याआधी आपण हे जाणून घेऊ कि सुका मेवा किती दिवस टिकू शकतो. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० सुकामेवा किती दिवस टिकू शकतो?
– विविध प्रकारचा सुकामेवा टिकण्याचा एक विशेष कालावधी असतो. सर्वसाधारणपणे घरात सामान्य वातावरण आणि हवाबंद डब्यात सुकामेवा किमान ६ महिने टिकवता येतो. तर फ्रीजमध्ये जवळजवळ वर्षभर सुका मेवा राहतो आणि डीप फ्रीजरमध्ये अगदी १ ते २ वर्ष व्यवस्थित टिकतो. मात्र फ्रीज अथवा डीप फ्रीजरमध्ये सुकामेवा साठवून ठेवताना तो छोट्या छोट्या हवाबंद पिशव्या वा डब्यांमध्ये ठेवा. चला तर जाणून घेऊयात सुका मेवा टिकविण्यासाठीच्या अत्यंत लाभदायक आणि सोप्या टिप्स खालीलप्रमाणे :-

१) ताजा खरेदी करा – सुकामेवा खरेदी करताना नेहमी फ्रेश आणि ताजाच खरेदी करा. कारण आधीच सुकलेला वा जुनाट सुकामेवा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे सुकामेवा फ्रेश नसेल तर जास्त प्रमाणात खरेदी करू नका.

२) हवाबंद डब्यात साठवा – हवेच्या संपर्कात आल्यामुळे कोणतीही गोष्ट खराब होते. यासाठी सुकामेवा स्वच्छ करून हवाबंद बरणीत भरून ठेवा. लक्षात ठेवा सुकामेव्याचे सर्व प्रकार निरनिराळ्या बरण्यांमध्ये ठेवा. एका बरणीत सर्व प्रकारचा सुकामेवा ठेवू नका. यामुळे एक प्रकार खराब झाल्यास सर्व एकत्रितपणे खराब होण्याची शक्यता असते.

३) थंड, कोरड्या जागी साठवा – स्वयंपाकघरात सुकामेवा साठवताना फ्रीजमध्ये अथवा थंड ठिकाणी सुकामेवा ठेवल्यास लवकर खराब होत नाही. मात्र, आगीजवळ, ओलसर ठिकाणी किंवा अती उष्ण जागी सुकामेवा ठेवला तर त्याला किड लागून तो खराब होतो.

४) रोस्ट सुकामेवा साठवा – सुकामेवा अधिक काळासाठी टिकवायचा असेल तर गरम तव्यावर हलका रोस्ट करा आणि साठवा. यामुळे त्याला किड लागत नाही आणि ते जास्त दिवस टिकलं. याशिवाय सुकामेवा खारवून म्हणजेच मीठ लावून रोस्ट करून टिकवलयास तो अधिक काळ टिकेलही आणि त्याची चवही वाढेल.