Body Pain
| | | |

कोणतंही दुखणं असो, बाभळीचे चूर्ण देईल आराम; जाणून घ्या फायदे आणि वापर

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बाभळी हि एक वनौषधी आहे. या झाडाच्या अगदी खोडापासून शेंगांपर्यंत प्रत्येक भाग हा फायदेशीर आहे. शिवाय आयुर्वेदात बाभळीचे अनेक आरोग्यदायी लाभ सांगितलेले आहेत. आयुर्वेदानुसार, शरीराचे कोणतेही दुखणे बाभळीच्या चूर्णाचे सेवन केल्यास दूर होते. मग ते दुखणे डोक्याचे असो, गुडघ्याचे असो वा सांध्यांचे. याशिवाय तोंडाचे विकारदेखील दूर करण्यासाठी बाभूळ उपयुक्त आहे. आयुर्वेदात बाभळीची पाने, डिंक, शेंगा आणि साल या सर्वांचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी होतो हे सांगण्यात आले आहे. म्हणूनच आज आपण बाभळीच्या चूर्णाचे फायदे जाणून घेणार आहोत.

० बाभळीच्या चूर्णाचे आरोग्यदायी फायदे:-

बाभळीच्या झाडाची पाने अतिशय लहान असतात. या झाडाला काटेही असतात. या झाडावर भरपूर शेंगा लागतात. बाभळीची साल, पाने आणि शेंगांचा वापर करून हे चूर्ण बनविले जाते. आजकाल बाजारात हे चूर्ण अगदी सहज उपलब्ध आहे. जाणून घ्या फायदे खालिलप्रमाणे:-

१) कमकुवत शरीर होईल मजबूत – शारीरिक थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी बाभळीचे चूर्ण फायदेशीर आहे. कारण बाभळीमध्ये ते सर्व पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्त्व पुरवतात.
० वापर – रस्ताही बाभळीचे चूर्ण पाण्यात वा दुधात मिसळून रोज दिवसातून एकदा प्या. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. याशिवाय तुम्ही हे चूर्ण मधात मिसळूनही खाऊ शकता.

२) सौम्य असो व तीव्र डोकेदुखी होईल दूर – कामाचा व्याप आणि वाढता ताण यामुळे अनेकांना डोक जड होणे, डोकेदुखी हे त्रास होतात. तर शालेय मुलांमध्येही हा त्रास सामान्य आहे. यांपैकी एक तुम्हीही असाल तर तुम्ही बाभळीचे चूर्ण खा. यामुळे मेंदूवरील ताण दूर होऊन आराम मिळतो.
० वापर – यासाठी बाभळीचे चूर्ण रोज सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यासोबत प्या.

३) असह्य पाठदुखीवर परिणामकारक उपाय – ऑफिसमध्ये खूपवेळा एकाच स्थितीत बसल्यामुळे अनेकांना पाठदुखीची समस्या जाणवते. यासोबतच शारीरिक हालचालींच्या अभावामुळेदेखील पाठदुखी होते. या त्रासावर बाभळीचे चूर्ण परिणामकारक उपाय आहे.
० वापर – यासाठी बाभळीच्या चूर्णाचे दुधासोबत सेवन करा. असे केल्याने पाठीचे स्नायू मजबूत होतात. परिणामी पाठदुखीपासून आराम मिळतो.

४) गुढघ्यांचं दुखणं विसरूनच जा – वय सुरू लागले कि सांधेदुखीची समस्या उदभवणे अतिशय सामान्य समस्या मानली जाते. पण यामुळे गुडघेदुखीची तक्रार जाणवते. मात्र आजकाल अनेक लोकांना वयाच्या आधीच गुडघेदुखी सुरू होते. अश्या गुडघेदुखीवर आराम हवा असेल तर बाभळीचे चूर्ण अतिशय लाभदायी आहे.
० वापर – यासाठी बाभळीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ हलक्या कोमट पाण्यासोबत प्या आणि जादू पहा.

५) जुलाब, अतिसार अशा त्रासांपासून सुटका – प्रमाणापेक्षा जास्त खाणे असो किंवा वारंवार बाहेरचे जेवण. अश्या आहारामुळे अनेकांना अतिसाराचा वा जुलाबाचा त्रास सतत होतो. त्यामुळे तुम्हालाही असा त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला बाभळीचे चूर्ण खाण्याचा सल्ला देऊ. याचे कारण असे कि या त्रासांवर बाभळीचे चूर्ण हा रामबाण उपाय आहे.
० वापर – याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे जास्त योग्य आहे.

६) स्त्रियांसाठी फायदेशीर – बाभळीचे चूर्ण महिलांच्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आजकालची जीवनशैली पाहता बहुतेक स्त्रिया ल्युकोरियाच्या त्रासाने वैतागल्या आहेत. ल्युकोरिया हा योनीतून पांढरा पाण्यासारखा स्त्राव आहे. ही समस्या स्त्रियांमध्ये सामान्य असली तरीही गंभीर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, आहार आणि स्वच्छतेचा अभाव. यासाठी बाभळीचे चूर्ण फायदेशीर मानले जाते.
० वापर – १ चमचा बाभळीचे चूर्ण दुधासोबत रोज घ्या. यामुळे ल्युकोरियाच्या समस्येवर आराम मिळेल. याशिवाय मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही बाभळीचे चूर्ण फायदेशीर आहे.

७) पुरुषांसाठी फायदेशीर – एखादा पुरुष धातूच्या आजाराने त्रस्त असेल तर बाभळी चूर्ण खाणे फायदेशीर ठरू शकते. (संभोग आणि लैंगिक उत्तेजनाशिवाय वीर्य स्खलन होण्याच्या स्थितीला ‘धातु रोग’ म्हणतात.) ही स्थिती लैंगिक समस्या आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाय गरजेचा आहे. याशिवाय पुरुषांच्या शीघ्रपतनाच्या समस्येवरही हे चूर्ण फायदेशीर आहे.
० वापर – यासाठी दररोज रात्री दुधासोबत बाभळीचे चूर्ण घ्यावे. असे केल्यास वरील समस्यांपासून आराम मिळेल.

महत्वाची टीप – बाभळीचे चूर्ण जरी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी तिचं सेवन मर्यादित प्रमाणातच करा. मर्यादित प्रमाणात खाल्ल्यानेच तुम्हाला त्याचे पुरेसे फायदे मिळतात. तसंच, जर तुम्हाला कोणत्याही गंभीर आजाराने त्रास होत असेल तर ही पावडर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी.