|

अ‍ॅक्नेच्या त्रासावर गव्हाचा रस परिणामकारक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हार्मोन्समधील सातत्याने होणारे बदल आपल्या त्वचेवर परिणाम करीत असतात. त्यात पुरुषनपेक्षा स्त्रियांमध्ये हार्मोन्सच्या बदलाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे स्त्रियांचा चेहरा वयोमानापेक्षा अधिक प्रौढ दिसू लागतो. शिवाय अ‍ॅक्ने ब्रेकआऊटचा त्रासदेखील वारंवार होतो. यामुळे पिंपल्ससोबत चेहऱ्यावर डाग आणि खड्डे दिसू लागतात. यामुळे आपले सौंदर्य धोक्यात येऊ लागते. मुख्य म्हणजे चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्समुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. तज्ञ सांगतात कि, त्वचेवरील छिद्रांमध्ये तेल आणि मळ प्रमाणापेक्षा जास्त साचून राहिल्याने अ‍ॅक्नेचा त्रास होतो. परंतु अ‍ॅक्नेचा त्रास दूर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होऊन देऊ नका.

अनेकदा आपण अ‍ॅक्नेपासून सुटका मिळवण्यासाठी ब्युटीपार्लरमध्ये जाऊन विविध महागड्या थेरेपी आणि उपचार करून घेतो. पण कालांतराने याचा प्रभाव कमी होतो आणि चेहरा निस्तेज होतो. यामुळे अनेको त्वचा रोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्वचेच्या कोणत्याही समस्येवर औषधोपचार करणे सोयीस्कर आहे. परंतू कमी प्रमाणात अ‍ॅक्नेचा त्रास असेल तर नैसर्गिक किंवा घरगुती उपचार पद्धतीने त्यावर मात करता येते, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असा एक घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहोत जो जाणून घेतल्यानंतर तुम्हीही आश्यर्यचकित व्हाल.

० घरच्या घरी कसा गव्हाचा रस कसा बनवतात?
– आजकाल गव्हाचा रस किंवा पावडर फूड मॉलमध्ये सहज उपलब्ध असतो. मात्र घरात जर गव्हाचा रस बनवायचा असेल तर त्यासाठी गव्हाची पात घरी लावा. परंतु गव्हाचा रस बनविण्यासाठी ७ दिवस जुन्या पती वापराव्या. यासाठी गव्हाच्या पाती स्वच्छ धुवून थोड्या थोड्या पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्याचा रस गाळून घ्या.

० अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठी गव्हाचा रस कसा वापरावा?
– गव्हाच्या पातीचा रस आपल्या चेहर्‍यावर कापसाच्या बोळ्याने एखाद्या फेसमास्क प्रमाणे लावा. गव्हाच्या पातीच्या रसात बुडवलेला कापसाचा बोळा चेहर्‍यावर फिरवून हळूवार लावा. हा पॅक सुकल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

– गव्हाचा रस हा एक असा घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे. जो अगदी वाढलेले वजन कमी करण्यापासून, मासिकपाळी दरम्यान होणारे त्रास, किडनीच्या समस्या आणि त्वचेचे विकार यांसाठी फायदेशीर मानला जातो. कारण गव्हाच्या रसात मिनरल्स, कॅल्शियम, आयर्न, सोडियम, मॅग्नेशियम यांसोबत व्हिटामिन ए, बी, सी आणि ई हे घटक देखील मुबलक प्रमाणात आढळतात. चला तर जाणून घेऊयात फायदे :-

० गव्हाचा रस चेहर्‍यावर लावल्याने अ‍ॅक्नेचा त्रास कमी होण्यास मदत होते. शिवाय यामुळे सूज आणि ब्रेकआऊटचा त्रास कमी होण्यास मदत होते.

० गव्हाच्या रसात अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक असतात. जे एजिंगचा त्रास आणि चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच त्वचा पुनरुज्जीवीत अर्थात डेड स्किन काढून टाकण्यासाठी मदत करते.

० गव्हाची पात सनटॅन कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात टॅन झालेली त्वचा गव्हाच्या रसाचा वापर करून पुन्हा उजळ करता येते. गव्हाचा पातीमधील स्किन टोनर गुणधर्म कोणत्याही ब्युटी क्रिम्स आणि ट्रीटमेंटपेक्षा अधिक फायदेशीर असतात.