When applying mascara on your face

आपल्या चेहऱ्यावर काजळ लावताना …..

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन ।  प्रत्येक मुलींना काजळ लावण्याची थोडीफार हा होईना सवय असतेच . काजल लावल्याने आपल्या चेहऱ्यावरचे सौदर्य वाढण्यास मदत होते. चेहरा हा जर खुलून दिसायचा असेल तर त्यावेळी तुमच्या मेकअप बरोबर काजळ चा वापर सुद्धा केला जाऊ शकतो. लहान मुलांपासून मोठ्या  महिलांपर्यंत  सगळे जण काजळ वापरतात . काजल हे आपल्या चेहऱ्यासोबत आपल्या डोळ्यांना सुद्धा फार गुणकारी आहे. पण काजळ लावताना थोड्याश्या प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे. काजल हे जर चेहऱ्याला लावत असाल तर त्यावेळी ते फिस्कटले जाऊ नये म्हणून कोणत्या प्रकारे काळजी हि घेतली पाहिजे हे जाणून घेऊया ….

काजळ लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा —

काजळ जर लावत असाल तर त्याच्यापूर्वी चेहरा हा स्वच्छ साबणाने धुवून घ्या. त्यानंतरच आपल्या चेहऱ्यासाठी काजळ लावा. काजळ लावताना कधीही तुमचा चेहरा हा तेलकट असला नाही पाहिजे. नाहीतर सारा चेहरा हा तेलकट होऊन चेहऱ्यावर काजळ उतरू लागेल .

आयशेडो वापरा—

काळ्या रंगापेक्षा ग्रे रंगाचे आयशॅडो वापरले तर तुमचा चेहरा हा अधिक खुलून दिसायला मदत होते. त्वचेवर ऑयलचे प्रमाणही कमी होतं. याने काजळ सौम्य होऊन दिवसभर टिकून राहतं.

पावडर लावा—

काजळ लावताना कमीत कमी पावडर चा थर लावून द्यावा. त्याने तुमची स्किन हि ऑईली राहत नाही. त्यामुळे काजळ हे पसरले जाणार नाही.

ब्लॉटिंग पेपर—

आपल्या पापण्या अधिक ऑयली असल्यास स्वत:कडे ब्लॉटिंग पेपर असू द्या. जेव्हाही ऑयली फिल व्हाल लागेल ब्लॉटिंग पेपरच्या मदतीने ते टिपून घ्या.

योग्य काजळ—

नेहमी उच्च ब्रँडेड काजळ वापरा. आपल्या डोळ्यांना याचा वापर केला जातो. त्यामुळे नेहमी काजळ वापरताना योग्य ब्रँडेड काजळ वापरले गेले पाहिजे.

जेल—

आपल्या डोळ्यांना सुद्धा जेल चा वापर केला तर त्यामुळे डोळ्यावरचे काजळ हे फिस्कटणार नाही. त्यामुळे चेहरा हा काळा पडला जाणार नाही. तसेच ते दिवसभर टिकून राहण्यास मदत होऊ शकते.